Bus Bai Bus Promo : OMG, इतके चपलांचे जोड? श्रेया बुगडेचा हा खुलासा ऐका तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 01:58 PM2022-09-16T13:58:08+5:302022-09-16T13:59:30+5:30

Bus Bai Bus Promo, Shreya Bugde : श्रेयाचं गॉगल आणि बॅग प्रेम सर्वांनाच परिचीत झालं आहे. याशिवाय श्रेयाला आणखी एका गोष्टीची भारी हौस आहे. ती म्हणजे, चपला...

Bus Bai Bus Prom marathi actress shreya bugde revealed about her footwear collection | Bus Bai Bus Promo : OMG, इतके चपलांचे जोड? श्रेया बुगडेचा हा खुलासा ऐका तर

Bus Bai Bus Promo : OMG, इतके चपलांचे जोड? श्रेया बुगडेचा हा खुलासा ऐका तर

googlenewsNext

झी मराठीवरील ‘बस बाई बस’  (Bus Bai Bus )हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंतच्या अनेक महिला सेलिब्रिटी आणि महिला सेलिब्रिटींसोबतच्या खास गप्पा, धम्माल मस्ती असं स्वरूप असलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. सध्या या कार्यक्रमाचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. शोच्या आजच्या एपिसोडमध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री श्रेया बुगडे ( Shreya Bugde ) हजेरी लावणार आहे.  

या प्रोमोमध्ये श्रेयाने एक मोठा खुलासा केला आहे. खुलासा कशाबद्दल तर चपलांच्या जोडाबद्दल. श्रेयाला शॉपिंगची अतिशय आवड आहे. विशेषत: बॅग्ज आणि गॉगल्स तिचा जीव की प्राण. प्रत्येक ड्रेसवर ती वेगळी बॅग तर घेते शिवाय प्रत्येक ड्रेसवर वेगळ्या ग्लासेस म्हणजे गॉगलही घालते. श्रेयाचं हे गॉगल आणि बॅग प्रेम आता सर्वांनाच परिचीत झालं आहे. याशिवाय श्रेयाला आणखी एका गोष्टीची भारी हौस आहे. ती म्हणजे, चपला. श्रेयाकडे किती चपलांचे जोड असावेत? तर त्याचा खुलासा तिने ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात केला.

 ‘बस बाई बस’च्या मंचावर तुझ्याजवळ चप्पलचे किती जोड आहेत, असा प्रश्न श्रेयाला विचारण्यात आला. यावर  माझ्याकडे 200 वर चप्पलचे जोड आहेत, असं ती म्हणाली. या उत्तराने सुबोधसह सर्वच चकित झाले आहेत. हा एपिसोड आज रात्री 9.30 वाजता पाहायला मिळणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून श्रेया बुगडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. श्रेयाच्या कॉमेडीचे आणि तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. यशोमुळे श्रेयाला अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे.  
 अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणा-या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘तू तिथे मी’, ‘अस्मिता’, ‘फू बाई फू’ अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही नाटकं सादर केली आहेत.

Web Title: Bus Bai Bus Prom marathi actress shreya bugde revealed about her footwear collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.