भाव्याला मिळाले सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 17:38 IST2016-06-21T12:08:34+5:302016-06-21T17:38:34+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भाव्या गांधीचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसाला त्याच्या ...

भाव्याला मिळाले सरप्राईज
त रक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भाव्या गांधीचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसाला त्याच्या मित्रमैत्रिणांकडून त्याला खूप चांगले सरप्राईज मिळाले. भाव्याचे सगळेच फ्रेंडस सकाळी त्याच्या घरी गेले होते. तो सकाळी उठल्यावर त्याचे मित्रमैत्रिण त्याला त्याच्या बिल्डिंगच्या गच्चीवर घेऊन गेले. त्यांनी समोरच्या बिल्डिंगवर भाव्याच्या फोटोसहित त्याला शुभेच्छा देणारे भले मोठे बॅनर लावले होते. एवढेच नव्हे तर सगळ्या मित्रमैत्रिणींनी त्याच्यासाठी खूप मोठा केकदेखील आणला होता. त्याने गच्चीवरच हा मोठाला केक कापला. हे सरप्राईज पाहून भाव्या खूपच खूश झाला होता. यावेळी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील त्याची सहकलाकार निधी भानूशालीही उपस्थित होती.