बॉलिवूडची गायिका रिचा शर्मा 'रायझिंग स्टार 2'चा मंचावर करणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 13:37 IST2018-02-26T08:07:12+5:302018-02-26T13:37:12+5:30

छोट्या पडद्यावर गायनाचा रिअॅलिटी शो 'रायझिंग स्टार'ने लाखो लोकांच्या हृद्याला इंडियाज फेव्हरीट 16 च्या मधुर आवाजा द्वारे स्पर्श केला ...

Bollywood singer Richa Sharma enters the stage of 'Raising Star 2' | बॉलिवूडची गायिका रिचा शर्मा 'रायझिंग स्टार 2'चा मंचावर करणार एंट्री

बॉलिवूडची गायिका रिचा शर्मा 'रायझिंग स्टार 2'चा मंचावर करणार एंट्री

ट्या पडद्यावर गायनाचा रिअॅलिटी शो 'रायझिंग स्टार'ने लाखो लोकांच्या हृद्याला इंडियाज फेव्हरीट 16 च्या मधुर आवाजा द्वारे स्पर्श केला आहे.हॅशटॅग उठाओ सोच की दीवार द्वारे स्पर्धकांच्या जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याऱ्या हृद्यद्रावक कथा प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून गेल्या आहेत.या आठवड्यात,प्रेक्षकांना चांगली मेजवानी मिळणार आहे कारण निष्णात पार्श्वगायिका आणि बॉलिवूडची संवेदनशील गायिका रिचा शर्मा 'रायझिंग स्टार 2' च्या या वीकेंडच्या एपिसोडमध्ये सेलिब्रिटी गेल्ट म्हणून येणार आहेत. त्या पार्श्वगायिकांची ग्रहणशक्ती बदलण्यात त्यांच्या सोनेरी आवाजात आणि माही वे, बिल्लो रानी आणि जोर का झटका या सुंदर गाण्यांमधून मदत करणार आहेत.रायझिंग स्टार 2 वर सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या, रिचा शर्मा म्हणाल्या,“ मी लहान असल्या पासूनच संगीत ही माझी आवड आहे. मी माझ्या वडीलां सोबत धार्मिक गाणी गात मोठी झाले आहे आणि मला सर्व प्रकारचे संगीत आवडते.एक प्रेक्षक म्हणून मला या शोची थीम #उठाओ सोच की दीवार लक्षवेधक वाटली.खरेतर हा मंच लोकांना त्याच्यातील अडथळे बाजूला ठेवून गायनाची आवड जोपासण्यासाठी मदत करत आहे यामुळे मी खरेतर या सीझन कडे आकर्षित झाले आहे. मी काही स्पर्धकांच्या कामगिरी पाहिल्या आहेत आणि त्या सर्व अतिशय उत्कृष्ट आहेत.इंडियाज फेव्हरेट 16 चा अनुभव घेण्यासाठी आणि मंत्रमुग्ध होण्यासाठी आता मी जास्त काळ थांबू शकत नाही.”रिचा शर्मा कलर्सच्या रायझिंग स्टार 2 च्या या आठवड्याच्या शनिवारच्या एपिसोडमध्ये 24 फेब्रुवारीला येणार आहेत.

नाविन्यपूर्ण आणि कल्पक विषय देण्यासाठी वचनबद्ध असलेली कलर्स वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन केंद्रभागी ठेवून भारताचा पहिला लाइव्ह रिअॅलिटी शो पुन्हा घेऊन येत आहे.या शोच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये जगभरातील हजारो महत्त्वाकांक्षी गायक त्यांचा संगीतमय पराक्रम सर्वात मोठ्या मंचावर दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत.'रायझिंग स्टार 2' या रिअॅलिटी शोमध्ये शंकर महादेवन,दिलजित दोसांझ आणि मोनाली ठाकूर रसिकांच्या परीक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

Web Title: Bollywood singer Richa Sharma enters the stage of 'Raising Star 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.