'रामायणा'संबधित सोप्या प्रश्नाचं उत्तर देताना सोनाक्षीची उडालेली भंबेरी, झालेली ट्रोल! काय होता 'तो' प्रश्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:57 IST2025-08-22T13:53:34+5:302025-08-22T13:57:23+5:30
सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, झाली होती ट्रोल; व्हिडीओ व्हायरल

'रामायणा'संबधित सोप्या प्रश्नाचं उत्तर देताना सोनाक्षीची उडालेली भंबेरी, झालेली ट्रोल! काय होता 'तो' प्रश्न?
Sonakshi Sinha: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत असणारा शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'. नुकतीच केबीसीच्या १७ व्या सीझनला सुरुवात झाली आहे. अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर बरेच स्पर्धक उत्तर देतात आणि लाखो रुपये जिंकतात. अशातच याचदरम्यान, बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. केबीसीच्या शोमध्ये सोनाक्षीला रामायणासंबंधित प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं. त्यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली होती. काय होता तो प्रश्न जाणून घेऊया...
२०१९ मध्ये केबीसीच्या ११ सीझनमध्ये सोनाक्षी सिन्हाने हजेरी लावली होती. त्यावेळी राजस्थानच्या रुमा देवी हॉट सीटवर बसल्या होत्या. त्यांच्या मदतीसाठी सोनाक्षी शोमध्ये आली होती. याचदरम्यान, होस्ट अमिताभ बच्चन यांनी सोनाक्षीला रामायणासंबंधित प्रश्न विचारला होता. रामायणानुसार हनुमंताने कोणासाठी संजीवनी औषधी आणली होती, हा प्रश्न विचारला होता.मात्र सोनाक्षीला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.तिने चक्क लाईफलाईनचा वापर केला होता. शिवाय लक्ष्मण हा पर्याय तिने निवडला. त्यामुळे अभिनेत्री प्रचंड ट्रोल झाली होती.
दरम्यान, या प्रश्नावर सोनाक्षी अडकल्याने अमिताभ बच्चन यांना देखील आश्चर्य वाटलं होतं.शिवाय या प्रश्नाचे उत्तर न दिल्यामुळे सोनाक्षीवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली.त्याच्या घराचे नाव'रामायण' असल्याने लोकांनी तिची खिल्ली उडवली होती.