पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:50 IST2025-12-30T15:49:16+5:302025-12-30T15:50:31+5:30
समाधान सरवणकर यांनी निवडणुकीचा AB फॉर्म दाखल केला. यावळे त्यांची पत्नी आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारीही सोबत होती.

पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
सध्या राज्यात मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक सगळ्यात प्रतिष्ठेची मानली जात असून सगळ्याच राजकीय पक्षांनी यासाठी कंबर कसली आहे. शिंदे गटाचे नेते सदानंद सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर गुरव यांनादेखील शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज या दोघांनाही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावळे अभिनेत्री तेजस्विनी लोणारीही पती समाधान सरवणकरांसोबत दिसली.
समाधान सरवणकर यांना प्रभादेवी-दादरमधील वॉर्ड क्रमांक १९४ मधून उमेदवारी जाहीर देण्यात आली आहे. आज समाधान सरवणकर यांनी निवडणुकीचा AB फॉर्म दाखल केला. यावळे त्यांची पत्नी आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारीही सोबत होती. सकाळी सिद्धिविनायकाच्या मंदिरात जात दर्शन घेत नंतर समाधान सरवणकरांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी शक्तिप्रदर्शन केल्याचंही दिसून आलं. समाधान सरवणकरांसोबत खांद्याला खांदा लावून तेजस्विनीही त्यांच्या या प्रवासात सहभागी झाली होती. यामुळे अभिनेत्रीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
तेजस्विनीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. मराठी कलाविश्वातील ती लोकप्रिय चेहरा आहे. तेजस्विनीला 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धी मिळाली. एक अभिनेत्री असण्यासोबतच ती निर्मातदेखील आहे. तर समाधान सरवणकर गेली कित्येक वर्ष राजकारणात सक्रिय आहेत. ४ डिसेंबर रोजी लग्न करत तेजस्विनी आणि समाधान यांनी संसार थाटला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.
