विकासने घेतला आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 15:02 IST2016-09-07T09:18:10+5:302016-09-24T15:02:54+5:30
सध्या सगळीकडेच गणपतीची धूम सुरू आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याकडेदेखील दरवर्षी गणपतीचे आगमन होते. त्यांच्या गणपतीला दरवर्षी न ...
.jpg)
विकासने घेतला आशीर्वाद
स ्या सगळीकडेच गणपतीची धूम सुरू आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याकडेदेखील दरवर्षी गणपतीचे आगमन होते. त्यांच्या गणपतीला दरवर्षी न चुकता शेफ विकास खन्ना हजेरी लावतो. मास्टरशेफ या कार्यक्रमाचा पाचवा सिझन लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे विकासने या सिझनच्या यशासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली. पण त्याचसोबत लता मंगेशकर यांचे आशीर्वाददेखील घेतले. याविषयी विकास सांगतो, "लता दीदी माझ्यासाठी आईप्रमाणे आहेत. त्यांना भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मी गेली चार वर्षं न चुकता गणपतीच्या पहिल्या दिवशी त्यांच्या घरी जातो. मी त्यांच्याकडून मास्टरशेफच्या नव्या सिझनसाठी आशीर्वाद घेतले. त्यांनी या नव्या सिझनसाठी मला आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत."