Birthday Special : राम कपूर आणि साक्षी तन्वरच्या १७ मिनिटांच्या इंटिमेट सीनने छोट्या पडद्यावर माजवली होती खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 02:05 PM2021-09-01T14:05:16+5:302021-09-01T14:05:48+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता राम कपूरचा आज ४०वा वाढदिवस साजरा करतो आहे.

Birthday Special: Ram Kapoor's 17 minute liplock scene went viral | Birthday Special : राम कपूर आणि साक्षी तन्वरच्या १७ मिनिटांच्या इंटिमेट सीनने छोट्या पडद्यावर माजवली होती खळबळ

Birthday Special : राम कपूर आणि साक्षी तन्वरच्या १७ मिनिटांच्या इंटिमेट सीनने छोट्या पडद्यावर माजवली होती खळबळ

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता राम कपूरचा आज ४०वा वाढदिवस साजरा करतो आहे. मालिकांव्यतिरिक्त राम कपूरने अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र त्याला जेवढी लोकप्रियता मालिकेतून मिळाली तेवढी चित्रपटातून मिळाली नाही. बडे अच्छे लगते है मालिकेतून त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत त्याने वयाच्या चाळीशीत एक इंटिमेट सीन दिला होता. त्याचा १७ मिनिटांचा लिपलॉक सीन सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

बडे अच्छे लगते हैं मालिकेतील राम कपूर आणि साक्षी तन्वरची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेतील ही जोडी छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरली होती. राम-साक्षीच्या केमिस्ट्रीमुळेच या मालिकेला खूप टीआरपी मिळत होती. या दोघांच्या एका इंटीमेट सीनने खूप धुमाकूळ घातला होता. टीव्हीवर जवळजवळ १७ मिनिटे टेलिकास्ट झालेल्या या इंटीमेट सीनची खूप चर्चा रंगली होती. टीव्हीवर सर्वाधिक वेळ चाललेल्या किसिंग सीनमध्ये हा इंटीमेट सीन गणला जातो.

१२ मार्च २०१२ रोजी राम-साक्षीचा हा किसिंग सीन टीव्हीवर प्रसारीत झाला होता. त्यानंतर या सीनची सगळीकडे खूप चर्चा रंगली होती, त्याची कल्पना राम-साक्षीने आयुष्यात कधी केलीच नसेल. राम-साक्षीच्या या इंटीमेट सीनमुळे मालिकेचा टीआरपीदेखील चांगलाच उंचावला. 


राम कपूर आणि साक्षी तन्वरची ‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका गुजराती नाटक पटरानीवर आधारित होता. २०११ ते २०१४ पर्यंत ही मालिका टेलिकास्ट झाली होती.

Web Title: Birthday Special: Ram Kapoor's 17 minute liplock scene went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.