Birthday Special : चार्ली चॅप्लिनच्या विनोदाने दिली अक्षयकुमारला प्रेरणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 11:54 IST2017-09-09T06:22:51+5:302017-09-09T11:54:07+5:30

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या विनोदावरील रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाच्या नवव्या आवृत्तीत देशातील काही कसलेले विनोदवीर एकत्र आले आहेत. त्यात ...

Birthday Special: Charlie Chaplin's Vinodan gave inspiration to Akshay Kumar! | Birthday Special : चार्ली चॅप्लिनच्या विनोदाने दिली अक्षयकुमारला प्रेरणा!

Birthday Special : चार्ली चॅप्लिनच्या विनोदाने दिली अक्षयकुमारला प्रेरणा!

ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या विनोदावरील रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाच्या नवव्या आवृत्तीत देशातील काही कसलेले विनोदवीर एकत्र आले आहेत. त्यात बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता अक्षयकुमार हा सुपरजज्ज किंवा बॉस म्हणून काम बघणार आहे; तर मल्लिका दुआ, झाकीर खान आणि हुसेन दलाल हे परीक्षक म्हणून काम बघतील. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात अक्षयकुमारने विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन याच्याविषयी आपले मत व्यक्त केले होते.
अक्षयने सांगितले की त्याला चॅप्लिनच्या विनोदाने नेहमीच प्रेरणा दिलेली असून आजही त्याने चॅप्लिनचे छायाचित्र आपल्या पैशाच्या पाकिटात ठेवलेले आहे. आपल्या जीवनात जेव्हा काही समस्या निर्माण होते, तेव्हा आपण चॅप्लिनचे शब्द आठवतो, असे अक्षयकुमारने सांगितले. अक्षयप्रमाणेच चॅप्लिनने जगभर अनेकांना प्रेरणा दिलेली आहे. विनोदाचा तो मुकुटमणी असून त्याच्या चित्रपटांनी केवळ सामान्य प्रेक्षकच नव्हे, तर अनेक कलाकारांवर सखोल प्रभाव टाकला आहे. त्याच्या भव्य व्यक्तिमत्त्वाकडे आदराने पाहिले जाते आणि त्याच्या नम्र वागणुकीचे नेहमीच उदाहरण दिले जाते.
अक्षयने चॅप्लिनचे वक्तव्य उदधृत केले, “तुम्ही क्लोज-अपमध्ये बघितलंत तर जीवन ही शोकांतिका आहे, परंतु दुरून तुम्हाला ते विनोदी वाटतं.” आपण चॅप्लिनचे हे वक्तव्य कायम लक्षात ठेवतो आणि यशस्वी होण्यासाठी प्रत्येक कलाकाराला कॉमेडीचा आश्रय घ्यावाच लागतो, असे अक्षयने सांगितले. 
या कार्यक्रमात यावेळी काही हटके विनोद पाहायला मिळतील आणि सामान्य प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे हास्याचा महोत्सवच ठरेल. तसेच अक्षय गोल्ड, पॅडमॅन आणि 2.0 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे अक्षयचे फॅन्स या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतील यात काही शंका नाही. 

Web Title: Birthday Special: Charlie Chaplin's Vinodan gave inspiration to Akshay Kumar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.