Bigg Boss11:प्रियांक शर्माच्या गर्लफ्रेंडने शेअर केले रोमँटीक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 17:50 IST2017-10-03T12:20:46+5:302017-10-03T17:50:46+5:30

बिग बॉसमध्ये सहभागी होणे म्हणजे पब्लिसिटी झालीच समजा. सतत कॅमरासमोर राहत प्रेक्षकांच्या मनं जिंकण्यासाठी स्पर्धक काहीही करायला तयार होतात. ...

Bigg Boss11: Romantic photos shared by Priyank Sharma's girlfriend | Bigg Boss11:प्रियांक शर्माच्या गर्लफ्रेंडने शेअर केले रोमँटीक फोटो

Bigg Boss11:प्रियांक शर्माच्या गर्लफ्रेंडने शेअर केले रोमँटीक फोटो

ग बॉसमध्ये सहभागी होणे म्हणजे पब्लिसिटी झालीच समजा. सतत कॅमरासमोर राहत प्रेक्षकांच्या मनं जिंकण्यासाठी स्पर्धक काहीही करायला तयार होतात. आता बिग बॉसचा पहिलाच एपिसोड झाला आहे. पहिल्या भागापासून स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यात प्रियांक शर्मा हा स्पर्धक बाहेरच्या जगातही आपली पब्लिसीटी इनकॅश करण्याचा प्रयत्न करतोय. होय,बिग बॉस' मध्ये येण्यापूर्वी सतत चर्चेत राहण्यासाठी  प्रियंकने जोरदार तयारी केली असल्याचे दिसतंय. त्याला कारणही तसे खासच आहे. ते म्हणजे प्रियाँक मॉडेल आणि अॅक्ट्रेस दिव्या अग्रवालला डेट करत आहे. प्रियांक बिग बॉसमध्ये असल्यामुळे ती प्रियांकला खूप मिस करत आहे. त्यामुळे दिव्याने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो अपलोड केले आहेत. त्यात ती प्रियांकबरोबर स्विमिंग पूलमध्ये रोमँटिक पोज देताना दिसत आहे. दोघांची पहिली भेट यूथ बेस्ड रिअॅलिटी शो 'स्प्लिट्स विला-10' च्या सेटवर झाली होती. दोघांच्या जोडीला भरपूर पसंत केली गेली होती.फॅन्स त्यांना प्रेमाने 'दिव्यंक' म्हणतात.प्रियांक 'बिग बॉस'मध्ये पोहोचताच त्याच्या गर्लफ्रेंडने शेयर केले रोमँटिक फोटो शूट करताच दिव्यंकची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

Also Read:Bigg Boss 11: Day1: हसिना पारकरच्या जावयाची पहिल्याच दिवशी दादागिरी,म्हणाला मीच आहे TRP


बिग बॉसच्या घरात गेलं आणि त्यातून निर्माण होणा-या वादांशी संबंध आला की आपुसकच वेगळी प्रसिद्धी मिळते. रातोरात त्या व्यक्तीचं नाव जगभरात पोहचतं. त्यामुळेच कलाकारांना या घरात झळकण्याची इच्छा असते.ग्लॅमरस, पैसा, झटपट हे संपूर्ण पॅकेज हवे असेल तर ‘रिअ‍ॅलिटी शो’सारखे दुसरे माध्यम नाही. त्यामुळेच छोट्या-मोठ्या पडद्यावरील कलाकार तसेच सुपरस्टार्स मंडळीदेखील रिअ‍ॅलिटी शोच्या मोहापासून कधीच लपून राहिलेले नाहीत. सध्या घरात सध्या सर्वाधिक मजेशीर व्यक्ती म्हणून आकाश ददलानीकडे बघितले जाते आहे.त्यामुळे सतत चर्चेत राहण्यासाठी प्रियांक शर्माने तर सुरूवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात कोणते स्पर्धक या शोमध्ये आपली छाप पाडतात ते पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title: Bigg Boss11: Romantic photos shared by Priyank Sharma's girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.