बिग बॉस : स्वामी ओमने वाजविली सलमानच्या कानाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2017 14:31 IST2017-01-08T14:26:35+5:302017-01-08T14:31:39+5:30

बिग बॉस सीझन-१० चा सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम यांचा तोंडपट्टा अजूनही सुरूच आहे. सुरुवातीला आरोपांची सरबत्ती आणि धमकी ...

Bigg Boss: Swami Omne plays the role of Salman Khan | बिग बॉस : स्वामी ओमने वाजविली सलमानच्या कानाखाली

बिग बॉस : स्वामी ओमने वाजविली सलमानच्या कानाखाली

बिग बॉस सीझन-१० चा सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम यांचा तोंडपट्टा अजूनही सुरूच आहे. सुरुवातीला आरोपांची सरबत्ती आणि धमकी देणाºया स्वामी ओमने आता थेट सलमानच्या कानाखाली वाजविल्याचा दावा केला आहे. अर्थात त्यांच्या या दाव्यात कितपत तथ्यता आहे, हे सांगणे मुश्किल आहे.


एका टास्कदरम्यान रोहन मेहरा आणि बानी जे यांच्यावर लघवी फेकणाºया स्वामी ओमची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे स्वामी ओम चांगलेच चवताळले असून, ते बिग बॉसच्या निर्मात्यांसह सलमानवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. आता तर त्यांनी सलमानच्या कानाखाली वाजविल्याचे सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे.
एका टीव्ही चॅनलवर मुलाखत देताना ते म्हणाले की, सलमान हा आयएसआय एजंट असून, त्याचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानी आतंकवादी हाफिज सय्यद यांच्याबरोबर संबंध आहेत. जेव्हा मला ही बाब कळाली तेव्हा मी त्याच्या जोरदार कानाखाली वाजविली. मात्र टीव्हीवर ही गोष्ट दाखविण्यात आली नसल्याचेही स्वामी ओम म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सलमानवर एकापाठोपाठ एक आरोप करताना म्हटले की, सलमानची ज्या दोन गुन्ह्यांमध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यासाठी त्याने न्यायाधीशांना शंभर-शंभर कोटी रुपये दिले आहेत. मात्र आता मी सलमानचे हे दोन्ही प्रकरण पुन्हा उकरून काढणार असून, याची पुनश्च चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडे पाठपुरावा करणार आहे. जोपर्यंत सलमानला अबू सालेमसोबत जेलमध्ये पाठविणार नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचेही स्वामी ओमने सांगितले. जेव्हा स्वामी ओमला त्यांच्यावरील खटल्यांविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी माझ्यावर कुठल्याच प्रकारचे गुन्हे दाखल नसून, मी निर्दोष असल्याचे म्हटले आहे.

स्वामी ओमच्या या आरोपांना बिग बॉसचे निर्माते तथा सलमान खान काय उत्तर देणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. त्याचबरोबर स्वामी ओम देत असलेल्या या धमक्या वास्तवात उतरतील की निव्वळ पोकळ आहेत, हेही बघणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, भारतीय संस्कृतीचे समर्थक म्हणविणाºया स्वामी ओमचे घरात अनेक रंग बघावयास मिळाले. त्यामुळे त्यांचे हे आरोप निराधार असावेत असा समज प्रेक्षकांना झाल्यास नवल वाटू नये.

Web Title: Bigg Boss: Swami Omne plays the role of Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.