'बिग बॉस ओटीटी' फेम अदनान शेख झाला बाबा, गेल्याच वर्षी मराठी मुलीसोबत थाटला संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:31 IST2025-07-01T18:31:29+5:302025-07-01T18:31:47+5:30
'बिग बॉस ओटीटी ३' फेम सोशल मीडिया स्टार अदनान शेखच्या घरी पाळणा हलला आहे. अदनान शेख बाबा झाला आहे. अदनाने त्याच्या सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

'बिग बॉस ओटीटी' फेम अदनान शेख झाला बाबा, गेल्याच वर्षी मराठी मुलीसोबत थाटला संसार
'बिग बॉस ओटीटी ३' फेम सोशल मीडिया स्टार अदनान शेखच्या घरी पाळणा हलला आहे. अदनान शेख बाबा झाला आहे. अदनाने त्याच्या सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अदनानला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. सोशल मीडियावरुन व्हिडिओ शेअर करत त्याने बाबा झाल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे.
"अल्लाहच्या कृपेने आम्हाला पुत्ररत्न झालं आहे. माझ्या भावना मी शब्दांत मांडू शकत नाही. त्याच्यासाठी प्रार्थना करा", असं अदनानने पोस्टमध्ये म्हटलं आहे. अदनानच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्याला शुभेच्छा देत त्याचं अभिनंदन केलं आहे. अदनानने गेल्याच वर्षी लग्न केलं होतं. त्याच्या पत्नीचं नाव आयेशा शेख असं आहे. आईबाबा झाल्यानंतर आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी ते आनंदी आहेत.
अदनान शेख हा सोशल मीडिया स्टार आहे. टिकटॉकवर रील बनवून त्याने प्रसिद्धी मिळवली होती. इन्स्टाग्रामवर त्याचे ११.९ मिलियन फॉलोवर्स आहेत. त्याच्या रील्सला प्रसिद्धी मिळते. अदनान शेख 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये सहभागी झाला होता. या सीझनमधील तो चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होता. अदनानने गेल्या वर्षी आयेशाशी लग्न केलं. आयेशाने लग्नानंतर धर्म बदलला. ती एक मराठी मुलगी असून लग्नाआधी तिचं नाव रिद्धी जाधव असं होतं.