Lock Upp शो जिंकल्यानंतर Munawar Fauquiला लागली लॉटरी, आता लवकरच दिसणार आणखी दोन शोमध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 02:54 PM2022-05-10T14:54:41+5:302022-05-10T15:00:00+5:30

70 दिवस संघर्ष केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui ) याने ‘लॉक अप’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आता तो आणखी दोन शोमध्ये दिसणार आहे.

Bigg boss ott 2 makers to approach munawar faruqui | Lock Upp शो जिंकल्यानंतर Munawar Fauquiला लागली लॉटरी, आता लवकरच दिसणार आणखी दोन शोमध्ये !

Lock Upp शो जिंकल्यानंतर Munawar Fauquiला लागली लॉटरी, आता लवकरच दिसणार आणखी दोन शोमध्ये !

googlenewsNext

लॉकअपचा विजेता ठरल्यानंतर सध्या सर्वत्र मुनव्वर फारुकीची चर्चा आहे.  लॉकअपमधून बाहेर आल्यानंतर मुनावरचे नशीब पूर्णपणे उलटले. याआधी बातमी आली होती की मुनव्वर फारुकी लवकरच खतरों के खिलाडी 12 मध्ये दिसणार आहे. बॉस ओटीटी 2 मध्ये मुनव्वर फारुकीला देखील पाहू शकता.

सोशल मीडियावर होत असणाऱ्या चर्चेनुसार, मुनव्वर फारुकीला बिग बॉस ओटीटी 2 साठी संपर्क साधण्यात आला आहे. हा शो कोरोनाच्या काळात सुरू झाला. जो करण जोहरने होस्ट केला होता. दिव्या अग्रवालने पहिल्या सिझनची विजेती ठरली होती तर दुसरीकडे, मुनवर फारुख बिग बॉस ओटीटीसाठी चांगला स्पर्धक असू शकतो. मुनव्वर फारुकीने त्याच्या प्रामाणिक पणाने  लॉकअप ट्रॉफी सहज जिंकली आहे.

शोमधून बाहेर पडल्यानंतर मुनवरचे अनेक सीक्रेट्सही प्रेक्षकांसमोर आले आहेत. मुनव्वरचं यापूर्वी लग्न झालं असून त्याला एक मुलगादेखील असल्याचं सत्य समोर आलं आहे. विशेष म्हणजे त्याचं हे सत्य ऐखल्यानंतर शोमधील स्पर्धकांसह प्रेक्षकही थक्क झाले होते. शो संपल्यानंतर बाहेर आल्यावर मुनव्वरने इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर केला होता. या  फोटोमध्ये त्याच्यासोबत एक तरुणी दिसत असून त्याने तिला मिठी मारली आहे. परंतु, या तरुणींने चेहऱ्यासमोर मोबाईल धरला आहे. त्यामुळे तिचा चेहरा फारसा नीट दिसत नाही. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार, या तरुणीचं नाव नाजिल आहे. त्यामुळे नाजिल ही मुनव्वरची रिअल लाइफ लव्ह असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.
 

Web Title: Bigg boss ott 2 makers to approach munawar faruqui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.