Bigg Boss Marathi season 2 : वीणा जगतापला अशा पद्धतीने व्हायचेय विनर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:02 IST2019-05-28T11:59:10+5:302019-05-28T12:02:14+5:30

वीणाने विविध मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली असून ती या शोच्या घरात आपली काय कमाल दाखविते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. वीणाने एका मालिकेत राधाची भूमिका साकारुन कमालच केली आहे.

Bigg Boss Marathi season 2: Veena Jagtap wants to be such a winner! | Bigg Boss Marathi season 2 : वीणा जगतापला अशा पद्धतीने व्हायचेय विनर!

Bigg Boss Marathi season 2 : वीणा जगतापला अशा पद्धतीने व्हायचेय विनर!

बिग बॉस मराठी सिझन 2’ चा धमाका सुरु झाला असून शोच्या घरात एन्ट्री करणाऱ्या  स्पधर्कांमध्ये वीणा जगतापचाही समावेश आहे. वीणाने विविध मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली असून ती या शोच्या घरात आपली काय कमाल दाखविते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. 
वीणाने एका मालिकेत राधाची भूमिका साकारुन कमालच केली आहे. ती या भूमिकेमुळे घराघरात पोहचली असून तिचे फॅन फॉलोविंगदेखील वाढले आहेत. वीणाने बिग बॉसच्या घरात नुकतीच एन्ट्री केली असून या कार्यक्रमात जाण्यापूर्वी तिने आमच्याशी गप्पा मारल्या.  


शोच्या घरात एन्ट्री होत असताना तुला काय फिल होत आहे असे वीणाला विचारले असता ती म्हणाली की, माझ्या पोटात खूपच बटरफ्लाय होतायत, खूपच एक्सायटिंग देखील वाटत आहे. नेमके तिथे काय होईल याची कल्पनाच मनात येत नाही, अशी ती म्हणाली. 


हे असे रिअ‍ॅलिटी शोज एकतर पब्लिसिटी स्टंट किंवा टिआरपी वाढविण्यासाठी आयोजित केले जातात, याबाबत तुझे काय मत आहे असे वीणाला विचारले असता ती म्हणाली की, नाही मला असे अजिबात वाटत नाही. कारण या घरात काय घडणार आहे हे कुणालाच माहित नसते, म्हणून ज्या गोष्टी आपल्याला माहितच नसतात त्याबद्दल कमेंट्स करणे चुकीचे आणि मला नाही वाटत की, बिग बॉस पब्लिसिटी स्टंट किंवा टिआरपी वाढविण्यासाठी कुठली स्ट्रॅटजी वापरत असेल. 


कार्यक्रमाचे होस्ट महेश मांजरेकरांबद्दल तुझा काय अनुभव आहे, याबाबत तिला विचारले असता ती म्हणाली की, मी महेश सरांना कधीच भेटली नाहीय. पण त्यांना भेटण्यासाठी मी खूपच उत्साही आहे. एकदा एका कार्यक्रमात मी त्यांना लांबून पाहिले होते तेव्हा त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छादेखील झाली होती, मात्र तसे घडले नाही. आता मात्र मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली असून मी खूप एक्सायटेड आहे, असे ती म्हणाली.  


तु या शोमध्ये एन्ट्री घेतली असून तु विनर होशिल का, असे वीणाला विचारले असता ती म्हणाली की, प्रत्येकाला वाटते की आपण विनर व्हावे. तसेच मलाही वाटतेय की, मी हा शो जिंकावा आणि कुणीतरी माझी पाठ थोपटावी. 

Web Title: Bigg Boss Marathi season 2: Veena Jagtap wants to be such a winner!