Bigg Boss marathi 4: बिग बॉसच्या घरात रंगणार 'विषय END' हे नॉमिनेशन कार्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:43 IST2022-11-07T15:43:11+5:302022-11-07T15:43:34+5:30
घरामध्ये आज रंगणार 'विषय END' हे नॉमिनेशन कार्य. कार्यात टीम A विरुध्द्व टीम B अशी एक निवडणूक होणार आहे.

Bigg Boss marathi 4: बिग बॉसच्या घरात रंगणार 'विषय END' हे नॉमिनेशन कार्य !
'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. पण बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची क्रेझ आता कमी झाली आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील हा कार्यक्रम मागे पडला आहे. दरम्यान काल घरातून त्रिशूल मराठे (Trishul Marathe) बिग बॉसच्या घरातून आऊट झाला आहे. आज घरामध्ये आज रंगणार 'विषय END' हे नॉमिनेशन कार्य. कार्यात टीम A विरुध्द्व टीम B अशी एक निवडणूक होणार आहे. "विषय END" या नॉमिनेशन कार्यात कोण नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
तर घरात दुसरीकडे समृद्धी आणि प्रसादमध्ये रंगणार आहे चर्चा घरातील काही निवडक सदस्यांनबद्दल. ज्यामध्ये समृद्धी प्रसादला सांगताना दिसणार आहे तिचे कोणत्या सदस्यासोबत बॉण्डिंग चांगले आहे आणि कोणासोबत नाही ? किंवा कोणाशी बोलताना ती दोनवेळा विचार करेल.
समृद्धी प्रसादला सांगताना दिसणार आहे, "किरण दादा आणि विकास त्यांच्याबसोबत मी दोन - तीन ते वेळा विचार करते कनेक्ट करायच्या आधी. कारण मग असं होतं कि, मला परत डिसपॉईंट नाही व्हायचं आहे. एकदा झाले, दोनदा झाले… तीनदा झाले परत नको. चॅन्सेस पण माझ्याकडे लिमिटेशन आहे. रोहित - रुचिराचं तुझ्याविरोधात काहीच नाहीये आणि मी तुला आता सांगते माझ्या मनात देखील तुझ्याविरोधात काहीच नाहीये. दुसरीकडे किरण माने, तेजस्विनी आणि अमृता धोंगडे यांचीदेखील चर्चा सुरु आहे. किरण माने सांगताना दिसणार आहेत, तो माझ्याविषयी आल्या दिवसापासून इन्सिक्युर आहे. अमृता धोंगडे म्हणाली, आता विचारायचं का जाऊन ? त्यावर किरण यांचे म्हणणे आहे, नको उगाच महत्व नका देऊ, तो इतका घोळ घालेन ना परत... त्यावर तेजस्विनीचे म्हणणे आहे, त्यावर त्याचे म्हणणे असेल माझं वैयक्तिक आहे."