Bigg boss marathi 4 : बिग बॉसच्या घरात अक्षय आणि अमृता देशमुखमध्ये पडली वादाची ठिणगी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:29 IST2022-12-15T14:22:45+5:302022-12-15T14:29:13+5:30
बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्याची सुरुवातच वादापासून झाली... आणि त्यात भर म्हणजे राखीचा घरातील राडा.

Bigg boss marathi 4 : बिग बॉसच्या घरात अक्षय आणि अमृता देशमुखमध्ये पडली वादाची ठिणगी!
बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्याची सुरुवातच वादापासून झाली... आणि त्यात भर म्हणजे राखीचा घरातील राडा. तिच्या चुकीच्या वागणुकीमुळे बिग बॉस यांनी काल तिला शिक्षेस पात्र आहे असे देखील सांगितले. घरातील वाद काही संपायचे नाव घेत नसताना आज अक्षय आणि अमृता देशमुखमध्ये देखील घरातील ड्युटी करण्यावरून रात्री वाद होताना दिसणार आहे.
अक्षयचे म्हणणे आहे, मी सकाळची आणि दुपारची भांडी सुद्धा घासली आणि रात्रीची... अमृता म्हणाली, हळू बोल.. अक्षय म्हणाला, तू मला झोपेतून उठवायला आलीस म्हणून... अमृता म्हणाली, मी विसरले होते, मी आता हो म्हणाले. तू हळू बोल ना ? रात्र झाली आहे.
अक्षय म्हणाला, हळू बोल तू मला नको सांगुस... हा माझा नॉर्मल टोन आहे कोणीही झोपलेलं नाहीये. आरोह देखील म्हणाला तू का चिडतो आहेस? अक्षय म्हणाला, एक मिनिटं मी झोपलो होतो हिने झोपेतून उठवून म्हंटलं. झोपेतून उठवून जी माणसं आपली तत्व मांडतातना तर त्यांनी पहिले त्या तत्वांबद्दल विचार करावा. मी आधीच बोलो होतो मी उद्या घासतो हा विचार आधीच करायचा... आणि हा वाद असाच सुरु राहिला