Bigg Boss Marathi 4 : अमृता धोंगडे - तेजस्विनीची नवी स्ट्रॅटजी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 13:40 IST2022-11-02T13:39:34+5:302022-11-02T13:40:00+5:30

Bigg Boss Marathi 4 :सध्या बिग बॉस यांनी "खुल्ला करायचा राडा" हे कार्य सदस्यांवर सोपवले.

Bigg Boss Marathi 4: Amrita Dhongde - Tejaswini's New Strategy! | Bigg Boss Marathi 4 : अमृता धोंगडे - तेजस्विनीची नवी स्ट्रॅटजी !

Bigg Boss Marathi 4 : अमृता धोंगडे - तेजस्विनीची नवी स्ट्रॅटजी !

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझन(Bigg Boss Marathi 4)ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हा सीझन सध्या मनोरंजक वळणावर आला आहे. सध्या बिग बॉस यांनी "खुल्ला करायचा राडा" हे कार्य सदस्यांवर सोपवले आणि त्याचसाठी तेजस्विनी आणि अमृता धोंगडे नवी स्ट्रेटेजी आखताना दिसणार आहेत. आता नक्की कोणती टीम जिंकणार ? हे आजच्या भागामध्ये कळेल. 

तेजस्विनी म्हणाली, अमृताला सांगताना दिसणार आहे, आता सगळं सामान इकडेतिकडे आहे. तू जे तेल बोलते ना ते वापरूया पण... अमृता म्हणाली, आतून सामना आणण्यासाठी आपण यशश्रीला ठेवण्याचा प्रयत्न करूया. तेजस्विनीचे म्हणणे आहे, खाली कोणी तरी लागणार आत वेगळा माणूस नाही जाऊ शकतं. अमृताचे म्हणणे आहे, तू नसशील तेव्हा मी असेनच ना आणि मग तू संचालक व्हायचं.

कोण आत जाणार ? कोण सामान आणणार ? कोण टार्गेट करणार ? याविषयीच्या चर्चा दोघींमध्ये सुरू आहेत. आता यांच्या नव्या स्ट्रॅटजी किती कमी येणार ते आजच्या भागामध्ये कळेल.  अजून काय झालं घरात कोणत्या चर्चा रंगल्या आणि कोणामध्ये झाला वाद हे आजच्या भागात कळेल. बिग बॉस मराठी सोमवार ते शुक्रवारी रात्री १० वाजता आणि शनिवारी - रविवारी रात्री ९.३० वाजता पाहायला मिळेल.

Web Title: Bigg Boss Marathi 4: Amrita Dhongde - Tejaswini's New Strategy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.