Bigg Boss Marathi 3: विशाल असं काय बोलणार, जे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच जोरदार धक्का बसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 18:04 IST2021-12-08T17:49:15+5:302021-12-08T18:04:02+5:30
बिग बॉसच्या घरात विशालचा आज वेगळाच अंदाज दिसून येणार आहे.

Bigg Boss Marathi 3: विशाल असं काय बोलणार, जे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच जोरदार धक्का बसणार
बिग बॉसच्या घरात विशालचा आज वेगळाच अंदाज दिसून येणार आहे. हुकूमशाह यांच्यासमोर आपले मत व्यक्त करताना तो बिग बॉस मराठीच्या घरातील काही सदस्यांची गुपितं देखील सांगणार आहे. विशालचे म्हणणे आहे, या घरात अजून एक आहे महारथी, जो स्वत:ला बोलण्याचा बादशाह समजतो आहे. तो म्हणजे आमचा एकमेव विकास पाटील. आता हे इतक मोठं गॉसिप नाहीये पण तरी महत्वाच आहे.. सोनाली आणि मीनलबद्दल ते गॉसिप आहे… सगळ्यांना वाटते जी महाराष्ट्राची वाघिण आहे, ती मीनल शाह त्यांच्याबद्दल हे गॉसिप आहे, विकास पाटील म्हटले की आपल्याला मीनलच बी पत्ता पण कट करायला लागतो. हे ऐकून सगळ्यांनाच धक्काच बसला. तो पुढे म्हणाला, तर मला हे म्हणायचा आहे की, जे बाकीचे प्लेयर आहेत त्यांनी कृपया सावध राहा, कारण कधी पण पत्ता कट होऊ शकतो.
घरातील ८ सदस्य त्या नगरातील जनता असणार आहेत तर नवे आलेले सदस्य हुकूमशहा. आता हे हुकूमशहा देत असलेले कार्य या सदस्यांना करावे लागणार आहे पण ते पूर्ण करताना त्यांची मात्र कसोटी लागणार आहे. त्यांची दमछाक होतं आहे हे दिसून येतं आहे. कोणी लोटांगण घालते आहे तर कोणी वारा तर कोणी गुडघ्यावर चालते आहे तर कोणी साष्टांग नमस्कार घालतं आहे. तृप्तीताईंचे म्हणणे आहे त्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे.