Bigg Boss Marathi 3: घरात कोणाचा होणार 'खेळ खल्लास' तर कोणते सदस्य जाणार सेफ झोनमध्ये ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 12:26 IST2021-12-07T12:16:46+5:302021-12-07T12:26:15+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेल्या नव्या सदस्यांना TOP ८ सदस्य आपल्याकडे ज्या स्पर्धकाची बाहुली आहे

Bigg Boss Marathi 3: घरात कोणाचा होणार 'खेळ खल्लास' तर कोणते सदस्य जाणार सेफ झोनमध्ये ?
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “खेळ खल्लास” हे नॉमिनेशन कार्य ! यामध्ये कोणाचा खेळ होणार खल्लास आणि कोणाला नवे सदस्य करणार सेफ? बघायला मिळणार आहे. या टास्कनुसार सदस्यांना घरातील सदस्य का अपात्र आहे याचे कारण द्यायचे आहे... आणि त्यानुसार सदस्य एलिमनेशनसाठी अनेक कारणे देताना दिसणार आहेत. आता ही कारणं घरात आलेल्या नव्या सदस्यांना किती पटणार आहेत ? आणि त्यांचा निर्णय काय असेल हे आज कळेलच.
या टास्कप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेल्या नव्या सदस्यांना TOP ८ सदस्य आपल्याकडे ज्या स्पर्धकाची बाहुली आहे तो स्पर्धक घरात रहाण्यास का अपात्र आहे आणि ते का पात्र आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत... तर, दुसरीकडे स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्य यांना एकमताने निर्णय घ्यायचा आहे की, त्यांना कोणत्या सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे. विशाल स्नेहाला मीराबद्दल सांगताना दिसणार आहे, गेम खेळताना ती मला फेअर खेळताना दिसली नाही... तर मीरा आदिशला सांगताना दिसणार आहे, मी माझा स्वभाव नाही बदलू शकतं. गायत्री आदिशला सांगणार आहे, हे (म्हणजेच उत्कर्ष) त्यांचं डोकं पुर्णपणे वापरत नाहीत.
काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाताच तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्यने सदस्यांना ते कुठे चुकत आहेत, कोण बरोबर खेळत आहेत, कोणाचा खेळ त्यांना आवडत आहे हे या तिघांनी सांगितले. विशालचे तृप्ती ताईंनी भरभरून कौतुक केले. तृप्ती ताईंकडून झालेल्या कौतुकामुळे विशालला अश्रु अनावर झाले.