Bigg Boss Marathi 3 : स्नेहाला वाचविण्यासाठी जय काय आखणार डावपेच ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 02:09 PM2021-10-12T14:09:26+5:302021-10-12T14:10:52+5:30

Bigg Boss Marathi 3:आदिशच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खळबळ उडाली आहे.

Bigg Boss Marathi 3: What will Jay do to save Sneha? | Bigg Boss Marathi 3 : स्नेहाला वाचविण्यासाठी जय काय आखणार डावपेच ?

Bigg Boss Marathi 3 : स्नेहाला वाचविण्यासाठी जय काय आखणार डावपेच ?

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन कार्य रंगणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे, सदस्यांची जीपमध्ये बसण्यासाठी धावपळ सुरू आहे आणि जीपमध्ये बसलेले सदस्य आहेत गायत्री, उत्कर्ष, स्नेहा, जय आणि मीरा. जीपमधील सदस्यांनी बहुमताने निवडलेल्या एका सदस्याला जीपमधून उतरावे लागणार आहे. उत्कर्षचे म्हणणे आहे स्नेहा (Sneha Wagh). आता स्नेहाला नॉमिनेशनमधून वाचविण्यासाठी जय कोणता डावपेच आखणार ? जयची साथ स्नेहाला मिळेल ? हे जाणून घेण्यासाठी (Bigg Boss Marathi 3) आजचा भाग पहावा लागेल.

याचसोबत स्नेहा आणि आदिशमध्ये आज पुन्हा एकदा वादाची ठिणगी. आदिशची एंट्री झाल्यापासून तो प्रत्येक सदस्याशी वाद घालताना दिसत आहे असे स्नेहाचे आणि इतर सदस्यांचे मत आहे. आदिशच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये खळबळ उडाली आहे. सगळेच त्याच्याविषयी तर काही त्याच्या विरोधात बोलू लागले आहेत. बिग बॉसने दिलेल्या कार्यामुळे आदिशबद्दल जय, उत्कर्ष आणि त्यांच्या गृपमध्ये नकारात्मक भावना आहे जी वेळोवेळी दिसून आली आहे. आदिश आणि जय नंतर आता स्नेहा आणि आदिश मध्ये देखील वाद होणार आहे. एका टास्क दरम्यान आदिश स्नेहाकडे चर्चा करायला जाणार आहे पण, त्या चर्चेचे रूपांतर भांडणामध्ये होणार आहे. आदिशला स्नेहाच्या संतापजनक प्रतिक्रियेचा सामना करावा लागणार आहे असे दिसत आहे. काही ना काही मुद्द्यांवरून खटके उडायला सुरुवात झाली आहे.

आदिशचे म्हणणे आहे की, “तुझं वैयक्तिकरित्या इरिटेशन असेल तर... पण प्रतिक्रिया अशी माझा इन्फ्लुएन्स, मी जे बोलतो आहे ते देखील काऊंट होणार आहे”. यावर स्नेहाचे म्हणणे आहे “तुमचे इन्फ्लुएन्स माझ्यासाठी काऊंट होत नाही तुम्हाला असे वाटत असेल मी तुमच्याकडे यावे प्रतिक्रिया मागायला तर तसे होणार नाही. मी काय विचारू”. या नंतर आदिशने देखील विचारले काय? त्यानंतर हा वाद वेगळाच दिशेला गेला. हे सर्व पाहण्यासाठी आजचा एपिसोड नक्की पहावा लागेल.

Web Title: Bigg Boss Marathi 3: What will Jay do to save Sneha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.