Bigg Boss Marathi 3: 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर विशाल निकमचं गावात जंगी स्वागत; Video पाहून व्हाल दंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 02:11 PM2021-12-29T14:11:23+5:302021-12-29T14:11:53+5:30

Vishal nikam: १०० दिवस घरात राहिलेल्या विशाल निकमने बाजी मारत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. म्हणूनच, सध्या सोशल मीडियावर सर्वत्र 'विशाल'मय वातावरण झालं आहे.

bigg boss marathi 3 vishal nikam grand welcome in his hometown | Bigg Boss Marathi 3: 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर विशाल निकमचं गावात जंगी स्वागत; Video पाहून व्हाल दंग

Bigg Boss Marathi 3: 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर विशाल निकमचं गावात जंगी स्वागत; Video पाहून व्हाल दंग

googlenewsNext

छोट्या पडद्यावर यंदा 'बिग बॉस मराठी'चं (bigg boss marathi 3) तिसरं पर्व चांगलंच गाजलं. या पर्वात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. त्यामुळे हे पर्व संपल्यानंतरही त्याची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. अलिकडेच या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. यावेळी १०० दिवस घरात राहिलेल्या विशाल निकमने (vishal nikam) बाजी मारत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. म्हणूनच, सध्या सोशल मीडियावर सर्वत्र 'विशाल'मय वातावरण झालं आहे. चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. इतंकच नाही तर विशालच्या गावीदेखील त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.

बिग बॉस मराठी ३ चा विजेता विशाल निकम याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचं गावात जंगी स्वागत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. ढोलताशांचा गरज, गुलाल, बैलगाडी असं अस्सल मराठमोळ्या पद्धतीने त्याचं गावात स्वागत झालं. गावकऱ्यांच्या याचप्रेमामुळे भारावून गेलेल्या विशालने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Bigg Boss Marathi 3 Winner : विशाल निकम ठरला Bigg Boss Marathi 3 चा विजेता

"दसरा दिवाळी सणाला बिग बॉस घरात होतो, गावी आल्यावर दिवाळीच साजरी झाली रावं! आनंदाची आतिशबाजी", असं कॅप्शन विशालने त्याच्या या पोस्टला दिलं आहे.

दरम्यान, विशाल निकम या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. तर जय दुधाणे हा उपविजेता झाला आहे. इतकंच नाही तर बिग बॉसच्या घरात विशालने ज्याला मोठा भाऊ मानलं तो विकास पाटील सेकंड रनरअप ठरला आहे. 
 

Web Title: bigg boss marathi 3 vishal nikam grand welcome in his hometown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.