Bigg Boss Marathi 3: 'शेतकरी राजा घेतोया गळफास...'; उत्कर्षच्या कवितेनं सदस्य झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 01:20 PM2021-12-09T13:20:37+5:302021-12-09T13:21:04+5:30

Bigg Boss Marathi 3: आज बिग बॉस मराठीचे घर भावुक झाले ते उत्कर्षने सादर केलेल्या कवितेने.

Bigg Boss Marathi 3: Utkarsh's farmers poetry made emotional to all member |  Bigg Boss Marathi 3: 'शेतकरी राजा घेतोया गळफास...'; उत्कर्षच्या कवितेनं सदस्य झाले भावुक

 Bigg Boss Marathi 3: 'शेतकरी राजा घेतोया गळफास...'; उत्कर्षच्या कवितेनं सदस्य झाले भावुक

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या साप्ताहिक कार्य सुरू आहे. ज्यामध्ये घरामध्ये हुकूमशहांचे राज्य आहे आणि त्यामध्ये सदस्य वेगवेगळे टास्क पूर्ण करत आहेत. ज्यामध्ये त्यांना बर्‍याच आव्हांनाना सामोरे जावे लागते आहे. पण आज बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 3)चे घर भावुक झाले ते उत्कर्षने सादर केलेल्या कवितेने.
 
उत्कर्ष म्हणाला, महाराष्ट्राच्या सर्व जनतेसाठी आणि मुख्यत: शेतकर्‍यांसाठी जे मला आता सुचते आहे ते सादर करत आहे. शेतकरी राजा घेतोया गळफास, सांगा कोण देईल त्याच्या पिला घास. दिसरात राबुनी जीव त्याचा जातो... कोण एक सांगा जो त्याची बाजू घेतो. सांगा कधी संपेल त्याचा वनवास... सांगा कोण देईल त्याच्या पिला घास... आदिश, गायत्री, विशाल यांना कविता सुरू असताना अश्रु अनावर झाले. अजून घरामध्ये काय काय घडले, हे पाहण्यासाठी आजचा भाग पाहावा लागेल.

साप्ताहिक कार्यामध्ये सदस्यांच्या संयमची लागणार कसोटी
बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यामध्ये सदस्यांच्या संयमची कसोटी लागणार आहे. ज्या सदस्याच्या विरोधात खेळले त्याचे पाय देखील धरण्याची वेळ येणार आहे. कारण घरात आलेले नवे सदस्य आता फक्त सदस्य नसून लिलिपुट नगराचे हुकूमशहा आहेत आणि बाकीचे ८ सदस्य जनता. त्यामुळे हुकूमशहाच्या आदेशाचे पालन करणे प्रजेस बंधनकारक असणार आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 3: Utkarsh's farmers poetry made emotional to all member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.