Bigg Boss Marathi 3 Update; बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार भन्नाट टास्क, जाणून घ्या “चोरीचा मामला”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 12:08 IST2021-11-23T11:59:42+5:302021-11-23T12:08:55+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडले “नॉमिनेशन एक्स्प्रेस” हे कार्य.

Bigg Boss Marathi 3 Update; Mira Jagannath And Jay Dudhane Discussion On New Task Choricha Mamla, Cheack Here | Bigg Boss Marathi 3 Update; बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार भन्नाट टास्क, जाणून घ्या “चोरीचा मामला”

Bigg Boss Marathi 3 Update; बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार भन्नाट टास्क, जाणून घ्या “चोरीचा मामला”

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस आज सदस्यांना भन्नाट टास्क देणार आहेत. आणि याचसाठी घरामध्ये भरणार आहे मासळी बाजार. टास्कमध्ये राडा, प्लॅनिंग होणार नाही असं तर शक्यच नाही ना. आज घरामध्ये सुरु आहे चोरीचा मामला. म्हणजेच बिग बॉस मराठीच्या मासळी बाजारात होणार आहे चोरी. टास्क जिंकायला सदस्य साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करतात. 

आपल्या टीमकडे कसे पैसे जास्त गोळा करता येतील यासाठी घरातील सदस्यांमध्ये सुरू आहे चोरी करण्याचे प्लॅनिंग. आता दुसरी टीम हे कितपत होऊ देईल हे  आजच्या भागामध्ये पाहायला मिळेल. याचविषयी आज मीरा, जय, उत्कर्ष यांची चर्चा सुरू आहे की, पैसे लपवूया तर दुसरीकडे, विशाल आणि मीनल यांची चर्चा सुरू आहे कसे पैसे चोरता येतील यावर.
 
मीराचं म्हणणं आहे, मी काय म्हणते आहे अर्धे पैसे मी आता लपवून ठेवते आहे. जयचे यावर म्हणणं आहे का ? ते नाही घेऊ शकतं पैसे. मीराची शंका आहे, ते तुझ्याकडून चोरू शकतील असे तिने उत्कर्षला देखील सांगितले. उत्कर्षचे म्हणणे आहे, पैसे घेणार कोण ना कोण तरी आपले. उत्कर्षने पैसे शर्टच्या आतमध्ये लपवले.विशालचे मीनलला म्हणणे आहे, आपण पैसे चोरू शकतो ना आताच एका दिवसाचे.पण त्याने पैसे शर्टच्या आत ठेवले आहेत. यांचा चालू झाला रे राडा. मीनल आणि विशाल पैसे चोरण्यात यशस्वी होतील का ? हे पाहणे रंजक असणार आहे.


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडले “नॉमिनेशन एक्स्प्रेस” हे कार्य. या आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले मीरा, सोनाली, विकास, मीनल आणि संतोष चौधरी (दादूस) हे सदस्य. बघूया आता या सदस्यांमध्ये कोणता सदस्य घराबाहेर जाणार आणि कोणते सदस्य सेफ ठरणार. 
 

Web Title: Bigg Boss Marathi 3 Update; Mira Jagannath And Jay Dudhane Discussion On New Task Choricha Mamla, Cheack Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.