Bigg Boss Marathi 3 : घरातील या सदस्यांना झाला तुरूंगवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 16:16 IST2021-10-22T16:16:18+5:302021-10-22T16:16:41+5:30
Bigg Boss Marathi 3:बिग बॉस यांनी नुकतेच विशाल, स्नेहा आणि गायत्री यांना नियमभंग केल्याने पुढील आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट केले आहे.

Bigg Boss Marathi 3 : घरातील या सदस्यांना झाला तुरूंगवास
बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. घरात सतत भांडणे, बाचाबाची पहायला मिळते आहे. टास्कदरम्यान एकमेकांशी टशन पहायला मिळत आहे. घरामध्ये दोन गट पडले आहेत. दरम्यान मीरा आणि मीनलला आज तुरुंगवास होणार आहे. (Bigg Boss Marathi 3)
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले की “बिग बॉस आदेश देत आहेत संतोष आपण जेलची चावी घेऊन मीरा आणि मीनल यांना त्वरित जेलमध्ये बंद करावे.” मीरा आणि मीनल यांनी नक्की काय केले, की बिग बॉस यांना हे पाऊल उचलावे लागले. हे आजच्या भागात समजेल. बिग बॉस यांनी नुकतेच विशाल, स्नेहा आणि गायत्री यांना नियमभंग केल्याने पुढील आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये थेट नॉमिनेट केले. आता मीरा – मीनलला तुरुंगवास होणार आहे.
'तुला माणसांची किंमत नाही' - सोनाली
घरामध्ये विशाल आणि सोनालीची भांडण, मस्करी सुरूच असते. पण आजची गोष्ट सोनालीच्या मनाला खूपच जास्त लागली आहे असे तिच्या बोलण्यावरून दिसून येते आहे. सोनाली विशालला म्हणाली, “जर मी तुझ्यामध्ये टाईम इनव्हेस्ट करते तर मला तुझ्याकडून रिटर्नची अपेक्षा आहे. विशाल म्हणाला, मी नाही करत का टाईम इनव्हेस्ट. सोनाली त्यावर म्हणाली, त्यांच्यातल्या गृपमधील सदस्यांनी कोणाचं दुसर्याच नावं घेतलं का ? तू का नाही माझे नाव घेतलेस. विशालचं म्हणण आहे, मला जे वाटले ते मी केले. सोनाली म्हणाली, उत्कर्ष म्हणाला सोनालीचा घसा... विशालनी तोच मुद्दा उचलून म्हणाला, त्याचे मत आणि माझे मतं क्लियर नको करूस. सोनाली म्हणाली, पहिल्या आठवड्यात माझा आवाज मोठा आहे म्हणून बोलले गेले. तेव्हापासून तुला माहिती आहे, बाकीच्यांना नसेल माहिती एखाद्या वेळेस... तू फालतू रिझन... विशाल म्हणाला फालतू नाहीये रिझन, तू माझ्या रिझनला फालतू नाही म्हणू शकत. सोनाली म्हणाली, “फालतूच आहे रिझन. तुला ना माणसांची किंमत नाही. खूप कमी किंमत आहे. तुझे स्टेटमेंट त्या व्यक्तींपेक्षा मोठे असतात. तुझे म्हणणे त्या व्यक्तींपेक्षा मोठे असते. तुझी सिचुएशन त्या व्यक्तीवर काय बेतलेली आहे त्यापेक्षा मोठी असते आणि प्रत्येक वेळेला असे झालेले आहे”.