Bigg Boss Marathi 3: या कारणामुळे किर्तनकार शिवलीलाला अश्रु अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 02:21 PM2021-09-22T14:21:29+5:302021-09-22T14:26:30+5:30

बिग बॉस मराठी सिझन ३ च्या घरामध्ये काल चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा टास्क सुरू झाला. ज्यामध्ये पुरुष मंडळी महिला सदस्यांना विनवणी करताना दिसून आले.

Bigg Boss Marathi 3: For this reason, Contestant kirtankar Shivleela Patil Gets Emotional | Bigg Boss Marathi 3: या कारणामुळे किर्तनकार शिवलीलाला अश्रु अनावर

Bigg Boss Marathi 3: या कारणामुळे किर्तनकार शिवलीलाला अश्रु अनावर

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते. मीराचे जयसोबत आणि स्नेहा बरोबर बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. मीराने जयला चांगलेच सुनावले “जय मला डोकं आहे”. तर स्नेहानेही मिराला चांगलेच खडसाताना सांगितले की, “ही काय पध्दत आहे का बोलायची” ? कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरुन वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. घरामध्ये झालेला वाद असो वा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो सगळेच चर्चेचा विषय बनले आहेत.

या घरातलं आयुष्यच जगावेगळं आहे. त्यामुळे कोणाशी पटवून घेताना किंवा कोणती खेळी खेळताना स्पर्धकांच्या नाकीनऊ येतं. सुरुवातीलाच स्पर्धकांनी त्यांचे खरं रुपं दाखवायला सुरुवात केली आहे. काही अगदी बिनधास्त आहेत तर काही अगदी हळव्या मनाची आहेत. घरातले वातावरण बघूनच स्पर्धक अनेकदा भावूक होतात. असेच काहीसे वातावरण घरात निर्माण झाले.


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा टास्क सुरू झाला. ज्यामध्ये पुरुष मंडळी महिला सदस्यांना विनवणी करताना दिसून आले. यातून दोन नावं समोर आली विकास आणि उत्कर्ष. या दोघांमध्ये लढत झाली आणि पहिल्या साप्ताहीक कार्याचा विजेता ठरला उत्कर्ष. मीराचा घरातील सदस्यांबरोबर वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन वाद झाला. तिचा राग सगळ्याच घरच्यांनी अनुभवला. आज शिवलीला घरामध्ये थोडीशी भावूक होताना दिसणार आहे. 

तिचे म्हणणे आहे की, “आईला बघताना कसे वाटत असेल, कसं वागावं कळतं नाहीये”. त्यावर मीनलने तिला समजावले “तू खूप छान वागते आहेस. चांगलं खेळते आहेस. तुझी मत क्लिअर आहेत. तुला कधीही काही वाटलं तर मी आहे तुझ्यासोबत. विशाल निकम देखील म्हणाला “माऊली तुम्ही खूप खंबीर आहात”.


कीर्तनकार म्हणून शिवलीला पाटील प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्यांची कीर्तनं प्रसिद्ध आहेत.सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटीलचं गाव. वेगळ्या वाटेनं वाटचाल करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाजप्रबोधन करण्याचे कार्य शिवलीला करत असतात. वयाच्या अवघ्या दहा वर्षाच्या असतानाच ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा किर्तन केली आहेत. याच माध्यमातून त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्गही निर्माण झाला आहे. आजपर्यंत एक हजार कीर्तन करत समाजप्रबोधन त्यांनी केले आहे. 
 

Web Title: Bigg Boss Marathi 3: For this reason, Contestant kirtankar Shivleela Patil Gets Emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.