Bigg Boss Marathi 3 : ‘डेव्हिल’ आहेस माहितीये पण इतका..., विकासच्या चाहत्यांनी विशालला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 03:21 PM2021-10-28T15:21:43+5:302021-10-28T15:23:26+5:30

Bigg Boss Marathi 3 : विकास आणि विशाल या दोघांना बिग बॉसच्या घरातील जय आणि वीरु म्हटलं जायचं. पण आता विकासला नॉमिनेट केल्यानंतर विशाल ट्रोल होतोय.

Bigg Boss Marathi 3 netizens slam vishal nikam for nominating vikas patil | Bigg Boss Marathi 3 : ‘डेव्हिल’ आहेस माहितीये पण इतका..., विकासच्या चाहत्यांनी विशालला सुनावलं

Bigg Boss Marathi 3 : ‘डेव्हिल’ आहेस माहितीये पण इतका..., विकासच्या चाहत्यांनी विशालला सुनावलं

googlenewsNext

बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन (Bigg Boss Marathi 3) दिवसेंदिवस चांगलाच रंगतोय. वेगवेगळे टास्क खेळताना स्पर्धकांचे खरे चेहरेही प्रेक्षक बघू शकत आहेत. सध्या बिग बॉस मराठीच्या घरातील दोन यार अर्थात विकास पाटील (Vikas Patil ) व विशाल निकम ( Vishal Nikam) यांची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांत चांगलंच बिनसलं आहे. देवदूत व राक्षस या टास्कदरम्यान विशाल व विकास यांच्यात चांगलीच जुंपली होती. त्याआधी विशालनं नॉमिनेट केल्यानंतर  विकास पाटील ढसाढसा रडताना दिसला होता. आता यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटणारच.
बिग बॉस मराठीच्या घरात विकास आणि विशाल या दोघांना बिग बॉसच्या घरातील जय आणि वीरु म्हटलं जायचं. पण आता विशालने आपल्या या खास मित्रालाच नॉमिनेट केल्यामुळे नेटकरी बोलणारच. अनेक नेटक-यांनी यावरून विशालला जबरदस्त ट्रोल केलं आहे.

 ‘विशालच्या वागण्यात ओव्हर कॉन्फिडन्स दिसायला लागला आहे. त्याच्याच टीममेंबरशी गरज नसल्यासारखा वागू लागलाय, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. विशाल खूप चुकतोय. सारखा विकासला टार्गेट करतोय, अशा शब्दांत एका चाहत्याने विशालला फटकारलं. विशाल बाबा काय झालंय रे तुला. तू डेव्हिल आहेस माहित आहे. पण इतका पण डेव्हिल बनू नकोस, असा सल्ला एका चाहत्याने त्याला दिला आहे.
अर्थात विशालची बाजू घेणारेही काही आहेत. विशाल तू खूप चांगला खेळतोय. जे विशालला ट्रोल करत आहेत. त्यांना खेळ समजलाच नाही, अशा शब्दांत अनेकांनी त्याची पाठराखण केली आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये विकासला राक्षसांद्वारे एक टास्क देण्यात आला. यामध्ये विकासला स्वत:चे महाग कपडे कापून स्विमिंग पूलमध्ये फेकावे लागले. बिग बॉसच्या सुरुवातीला विशालला प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळाला. तोच या सिझनचा विजेता ठरणार, असं अनेकांचं मत होतं. मात्र घरातील त्याचं बदलतं वागणं पाहून आता प्रेक्षकसुद्धा संभ्रमात आहेत.  


 

Web Title: Bigg Boss Marathi 3 netizens slam vishal nikam for nominating vikas patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.