Bigg Boss Marathi 3: 'लोका सांगे ब्रह्मज्ञान', शिवलीला पाटीलला या जुन्या व्हिडिओवरून केलं जातंय ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 13:42 IST2021-09-28T13:42:19+5:302021-09-28T13:42:44+5:30
बिग बॉसच्या घरातील शिवलीला पाटीलची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे

Bigg Boss Marathi 3: 'लोका सांगे ब्रह्मज्ञान', शिवलीला पाटीलला या जुन्या व्हिडिओवरून केलं जातंय ट्रोल
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनला सुरूवात होऊन एक आठवडा झाला आहे. घरात काही सदस्यांची मैत्री झालेली दिसते आहे तर काहींचे वाद होताना दिसत आहे. यंदाच्या सीझनची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसते आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. तशीच चर्चा बिग बॉसच्या घरातील शिवलीला पाटीलची होताना दिसते आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
शिवलीला पाटील प्रसिद्ध किर्तनकार आहे. सोशल मीडियावर तिचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. किर्तन करण्याची तिची एक वेगळी स्टाईल आहे. मात्र सध्या तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती महिलांबद्दल काही वक्तव्य करताना दिसते आहे. आजकालच्या महिला पदर मागे ,केस मोकळे सोडून फिरतात, असे ती या व्हिडिओत बोलताना दिसते आहे.
सोशल मीडियावर युजर्सने हाच मुद्दा घेत तिला ट्रोल केले आहे आणि तिचा बिग बॉसमधील व्हिडिओ देखील व्हायरल केला. या व्हिडिओत ती केस मोकळे सोडून नाचताना दिसते आहे. किर्तन, किर्तनकार या शब्दांशी वारकरी संप्रदायच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे असे वागणे पटणारे नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
शिवलीला पाटीलच्या कीर्तनात कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग, समाजातील वेगवेगळ्या गोष्टी, अधूनमधून विनोदाची पेरणी असते. त्यामुळे तिच्या कीर्तनाला चांगला प्रतिसाद मिळतो. तिची कीर्तनाची स्वतःची अशी वेगळी शैली आहे. सोशल मीडियावर तिचा फॅन फॉलोव्हिंगदेखील आहे आहे. कमी कालावधीत शिवलीलाने आपली ओळख निर्माण केली आहे.