Bigg Boss Marathi 3: 'इतके वाईट मला कधीच वाटले नाही', सोनाली पाटीलला अश्रू झाले अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 17:40 IST2021-10-11T17:38:58+5:302021-10-11T17:40:50+5:30
बिग बॉसच्या घरात सोनाली पाटील भावूक झालेली पहायला मिळाली.

Bigg Boss Marathi 3: 'इतके वाईट मला कधीच वाटले नाही', सोनाली पाटीलला अश्रू झाले अनावर
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझन सुरू होऊन काही दिवस झाले आहेत आणि शो चर्चेत येतो आहे. पहिल्या दिवसांपासून बिग बॉसच्या घरात धमाल मस्ती, वाद विवाद पहायला मिळाले. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. या आठवड्यात अक्षय वाघमारेला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. तर बिग बॉस मराठीमध्ये सीझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली. घरात आदिश वैद्यची एन्ट्री झाली. दरम्यान घरामध्ये अनेक सदस्यांना इमोशनल होताना पाहिले. नुकतेच बिग बॉसच्या घरातील सदस्य सोनाली पाटील भावूक झालेली पहायला मिळाली.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनेक सदस्यांना भावुक होताना पाहिले आहे. कधी दुसर्यांच्या वाईट बोलण्याने तर कधी घराच्यांच्या आठवणीने तर कधी घरातल्याच एखाद्या जवळच्या सदस्याच्या वागणुकीमुळे. तसेच काहीसे सोनाली पाटीलसोबत आज झाले आहे.
मीनलच्या वागणुकीमुळे सोनाली आणि विकास दुखावले आहेत. सोनालीला याच कारणामुळे अश्रू अनावर झाले आणि ती विशालसमोर मन मोकळे करताना दिसणार आहे. सोनालीचे म्हणण आहे की, “इतके पण अंडरस्टॅंडिंग नाही आहे का ? मला मीनलचे वागणे नाही आवडले. इतके कोणाला इग्नोर करणे बरे नाही. मला इतके वाईट कधीच नाही वाटले”.