Bigg Boss Marathi 3, Episodes, 9 Nov : मीरा VS स्नेहा, मीरा आणि स्नेहामध्ये होणार जोरदार भांडण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 12:02 PM2021-11-09T12:02:36+5:302021-11-09T12:02:56+5:30

Bigg Boss Marathi 3: मीरा आणि घरातील काही सदस्यांमध्ये वाद होताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 9 Nov: Meera VS Sneha, Meera and Sneha will have a big fight | Bigg Boss Marathi 3, Episodes, 9 Nov : मीरा VS स्नेहा, मीरा आणि स्नेहामध्ये होणार जोरदार भांडण

Bigg Boss Marathi 3, Episodes, 9 Nov : मीरा VS स्नेहा, मीरा आणि स्नेहामध्ये होणार जोरदार भांडण

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन मीराला बिग बॉस यांच्या आदेशानुसार अतिशय कठीण असा निर्णय असा घ्यावा लागला. घरातील काही सदस्यांमुळे टास्क रद्द होतात, काही सदस्य घरातील नियमभंग करतात, काही सदस्यांद्वारे टास्कमध्ये आक्रमकता दाखविली जाते अशा सदस्यांची नावे काल मीराला द्यावी लागली ज्यामध्ये सोनाली, विकास, जय, विशाल आणि दादूस यांचे नावं होते. (Bigg Boss Marathi 3) आजदेखील मीराला अशीच नावे द्यायची आहेत आणि त्यावरून मीरा आणि घरातील काही सदस्यांमध्ये वाद होणार आहे.
 
मीरा म्हणाली, स्वत: ट्राय नाही कारायचा. जय म्हणाला, स्वत:ला ट्राय काय नाही करायचे, आम्हीच ट्राय केले. जरा बघा डोळे उघडा आणि कान पण उघडा... त्यावर मीराचे म्हणणे आहे तुम्ही प्रयत्न नाही केला. विकासने देखील यावर त्याचे म्हणणे मांडले ट्राय करण्याच्या बाबतीत तुम्ही जी तीन नावे दिली आहेत त्यांनी सर्वात जास्त ट्राय केले आहे असे मला अजूनही वाटते आहे. जे लोक सर्वात जास्त बोलले आहेत तेच तळ्यात आहेत. बाहेरून दिसताना हेच दिसणार आहे जे लोकं सर्वात जास्त बोले त्यांनाच तुम्ही शिक्षा देत आहात. या वादात स्नेहा आणि मीरामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी अडणार आहे.

मीरा VS स्नेहा

मीराचे म्हणणे आहे इथे समोर येते मी तेव्हा बोलायचे. स्नेहा बोलत असताना मीरा बोलत होती त्यावर स्नेहा म्हणाली ए थांब... मीरा तिला म्हणाली... थांब नाही बोलायचे मला... स्नेहा म्हणाली, मी तेव्हाच बोलले... मीरा म्हणाली, तेच तेच परत बोलून काहीच होणार नाहीये, जरा काहीतरी नवीन शोध. नक्की हा वाद कशावरून झाला ? हे आजच्या भागात समजेल.
 

Web Title: Bigg Boss Marathi 3, Episodes, 9 Nov: Meera VS Sneha, Meera and Sneha will have a big fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.