Bigg Boss Marathi 3, Episodes, 19 Nov: कोणते सदस्य असतील शिक्षेस पात्र ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 13:59 IST2021-11-19T13:58:26+5:302021-11-19T13:59:18+5:30
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडलेल्या 'हो पाइपलाईन तुटायची नाय' या साप्ताहिक कार्यामध्ये स्नेहा कॅप्टन्सीच्या कार्यासाठीची पहिली उमेदवार ठरली.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 19 Nov: कोणते सदस्य असतील शिक्षेस पात्र ?
बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन सुरू होऊन ४५ दिवस उलटले आहेत. हळूहळू घरातील सदस्यांचे खरे स्वभाव प्रेक्षकांसमोर आले आहेत. घरात दररोज भांडणे, वाद, गॉसिप होताना पाहायला मिळतात. इतकेच नाही तर रुसवा फुगवा देखील पहायला मिळतो. दरम्यान बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरामध्ये पार पडलेल्या “हो पाइपलाईन तुटायची नाय” या साप्ताहिक कार्यामध्ये स्नेहा कॅप्टन्सीच्या कार्यासाठीची पहिली उमेदवार ठरली. अजून कोणता सदस्य उमेदवार असेल ? टास्क करा पार पडला जाईल ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल नक्की कोणते सदस्य शिक्षेस पात्र आहेत.
बिग बॉस यांनी जाहीर केले, घरातील काही सदस्य कार्य अनिर्णित कसे ठेवले जाईल या प्रयत्नात दिसले. परिणामी दोषी सदस्यांचे वास्तव्य जेलमध्ये असेल. कोणी आणले कार्यामध्ये विघ्न ? कोणात्या सदस्यांना मिळणार कारागृहाची शिक्षा ? हे आजच्या भागात कळेल.
बिग बॉस गायत्रीला आज देणार एक विशेष सूचना
आज बिग बॉस गायत्रीला एक विशेष सूचना देणार आहेत. बिग बॉस यांनी गायत्रीला सांगितले, आजचे कार्य पार पाडताना आपल्याला दुखापत झाली. तसेच पुढील किमान तीन आठवडे आपल्याला स्लिंग घालायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. याचसोबत टास्क खेळण्यासाठी देखील मनाई केली आहे. आता आपल्याला त्वरित आराम मिळणे जास्त आवश्यक आहे, असे बिग बॉस यांनी गायत्रीला सांगितले.