Bigg Boss Marathi 3, Episodes, 09 Dec: सोनाली आणि मीनलचा भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 16:57 IST2021-12-09T16:57:13+5:302021-12-09T16:57:43+5:30
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर लिलिपुट नगरात केल्यापासून सदस्यांची झोप उडाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 09 Dec: सोनाली आणि मीनलचा भन्नाट डान्स
जेव्हापासून बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर लिलिपुट नगरात करण्यात आले आहे तेव्हापासून सदस्यांची झोप उडाली आहे असं म्हणायला हरकत नाही. घरामध्ये हुकूमशहा कठीण कठीण टास्क या सदस्यांना सोपवत आहेत आणि त्यामुळे त्यांची तारांबळ उडत आहे. (Bigg Boss Marathi 3)
नुसते टास्कच नाही तर त्यांना शिक्षा देखील भोगावी लागत आहे. आज उत्कर्ष आणि विशालच्या संयमाची कसोटी लागणार आहे. तर दुसरीकडे घरात बघायला मिळणार आहे सोनाली आणि मीनलचा भन्नाट डांस.
हुकूमशहा सदस्यांना देणार कठीण टास्क
उत्कर्ष आणि विशाल यांना हुकूमशहा आज एक कठीण टास्क देणार आहेत. या कसोटीमध्ये ग्लासमधील दही आणि त्यातील मिश्रण दोघांना हात न लावता पूर्ण खायचे आहे. जो सदस्य लवकर पोहचणार आहे त्याला संधी प्राप्त होणार आहे. आता ही कुठली संधी मिळणार आहे हे आज कळेलच. तर दुसरीकडे सोनाली आणि मीनल चिकनी चमेली या गाण्यावर धम्माल नृत्य सादर केले. आज सदस्यांनी घरात काय काय धमाल केली, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.