Bigg Boss Marathi 3: “घरात आल्या आल्या पहिल्याच दिवशी स्नेहाने साधला आदिशवर निशाणा, वाचा काय म्हणाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 16:06 IST2021-10-11T16:05:44+5:302021-10-11T16:06:02+5:30
Bigg Boss Marathi 3 :मध्ये सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली.आदिश वैद्य हा पहिला वाईल्ड कार्ड एंट्री करणारा स्पर्धक आहे.

Bigg Boss Marathi 3: “घरात आल्या आल्या पहिल्याच दिवशी स्नेहाने साधला आदिशवर निशाणा, वाचा काय म्हणाली
'बिग बॉस मराठी सिझन ३' हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद – विवादाने घर गाजवत आहेत...ईथे अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये ग्रुप्स देखील तयार झाले आहेत... बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे.या आठवड्यामध्ये अक्षय वाघमारेला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. तर बिग बॉस मराठीमध्ये सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली.
घरामध्ये जायच्या आधीच बिग बॉस आदिशला खूप कठीण टास्क दिले आहेत.आदिशला पॉवर कार्ड मिळविण्याची संधी बिग बॉस देणार आहेत आणि ती संधी त्याने स्वीकारली देखील आहे. पण त्याच्या बदल्यात घरातील कोणत्याही तीन सदस्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. ती म्हणजे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे. आता आदिशने कुठल्या तीन सदस्यांची निवड केली ते आज कळेलच. पण त्यावरून स्नेहा वाघ त्याला टोमणे मारताना दिसणार आहे.
स्नेहा आदिशला म्हणाली, “आल्या आल्या त्रास दिला तुम्ही सगळ्यांना. जसं की आमचे तीन लोकं जखमी केले. त्यावर आदिश म्हणाला “कुठले तरी तीन होणारच होते. जर तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असत ? स्नेहा म्हणाली “माझी पध्दत वेगळी असती. मी वेगळ्या पध्दतीने डील केलं असंत. म्हणजे माझ्या पध्दतीने मी डील केलं असंत. नॉट नेसेसरी की आपल्या कोणत्या गोष्टीने समोरच्याला त्रास झालाच पाहिजे, त्याचा त्रास कमी करूसुध्दा गोष्टी करू शकतो. आदिश म्हणाला, “ त्या दृष्टीने मी पूर्ण प्रयत्न केला आहे”. कोणकोणत्या गोष्टी खटकतात ? हे पाहणे रंजक असणार आहे.