Bigg Boss Marathi 3 : आदिश वैद्यला बिग बॉसने सोपविले हे कठीण कार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 13:11 IST2021-10-11T13:10:49+5:302021-10-11T13:11:18+5:30
Bigg Boss Marathi 3 : आज आदिश वैद्य घरामध्ये जाणार आहे. पण, त्याआधीच बिग बॉस त्याला एक कठीण असे कार्य सोपवणार आहेत.

Bigg Boss Marathi 3 : आदिश वैद्यला बिग बॉसने सोपविले हे कठीण कार्य
कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'चा तिसरा सीझन (Bigg Boss Marathi 3) बऱ्याच कारणामुळे चर्चेत येत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमधील वादविवाद, भांडणे यांच्यामुळे शो चर्चेत आला होता. काही दिवसातच या घरात तीन ग्रुप पडल्याचे पाहायला मिळाले. शोमध्ये आता नॉमिनेशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठीच्या घरामधून काल एक सदस्य घराबाहेर पडला तर एका नवा सदस्याची एंट्री घरामध्ये झाली. काल अक्षय वाघमारेला घराबाहेर पडावे लागले. तर बिग बॉस मराठीमध्ये काल झाली सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री. आदिश वैद्यची धमाकेदार परफॉर्मन्ससोबत एन्ट्री झाली.
आज आदिश वैद्य घरामध्ये जाणार आहे. पण, त्याआधीच बिग बॉस त्याला एक कठीण असे कार्य सोपवणार आहेत. बिग बॉस आदिशला बहुमूल्य टेंप्टेशन स्वीकारण्याची सुवर्णसंधी देणार आहेत आणि ते टेम्पटेशन आहे पॉवर कार्ड. या पॉवरद्वारे घरातील कोणता सदस्य कोणते काम करणार याची विभागणी करण्याचा अधिकार आदिशकडे असणार आहे. ज्यामुळे दिवसभरातील कारभारावर आदिशचे वर्चस्व असणार आहे. पण आता हे टेम्पटेशन स्वीकारल्यास परिणाम स्वरूप या पॉवर कार्डची किंमत घरातील सदस्यांना मोजावी लागणार आहे. आदिश पॉवर कार्डचा स्वीकार करणार आहे.
बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे. आता बघूया आदिश कोणत्या तीन सदस्यांची नावे देतो ते आजच्या भागामध्ये कळेल.