Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यापूर्वी अक्षय वाघमारेने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:30 PM2021-10-05T19:30:03+5:302021-10-05T19:30:42+5:30

बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अक्षयने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Bigg Boss Marathi 3: Akshay Waghmare made this big decision before entering Bigg Boss's house, you will appreciate it by reading | Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यापूर्वी अक्षय वाघमारेने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल कौतुक

Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यापूर्वी अक्षय वाघमारेने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल कौतुक

googlenewsNext

बिग बॉस मराठी सीझन ३ च्या दुसऱ्या आठवड्याला सुरूवात होताच स्पर्धकांमध्ये परस्परांविरूद्ध शाब्दिक टशन दिसू लागली आहे. बुद्धी चातुर्य आणि शक्तीच्या या खेळात अनेकांनी घातलेले सभ्यतेचे मुखवटे आता गळून पडले असून, त्यांचे खरे चेहरे बाहेर आले आहेत. मात्र, यामध्ये अक्षय वाघमारे हा एकमेव सदस्य अपवाद ठरला. घरात वावरताना असो वा टास्क दरम्यान असो अक्षयने आपला संयम कधीच ढासळू दिला नाही. त्याचा हा संयमीपणा चाहत्यांना आवडत असून ख-या आयुष्यात ही तो तितकाच नम्र आणि संवेदनशील असल्याचे त्याच्या एका कृतीतून दिसून आले आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अक्षयने मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत, संबंधित संस्थेकडे त्याने मरणोत्तर अवयवदानाचे संमतीपत्र भरून देखील दिले आहे! त्या संमती पत्रानुसार तो मृत्यूनंतर फुफ्फुस, मुत्रपिंड, स्वादुपिंड, किडनी आणि त्वचा दान करणार असल्याचे सिद्ध झाले आहे.

विशेष म्हणजे,  याबद्दल खूपच कमी जणांना माहिती आहे. त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक तर होत आहे, पण त्याबरोबरच त्याने केवळ बिग बॉसच्या घरात नाही तर सर्व चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात, आपल्याहून वयाने मोठे असलेल्या सदस्यांचा तो नेहमी आदर करताना दिसून येत आहे. त्यामुळे घरातील सदस्यांच्या गुडबूक्समध्ये तो आला असून, पुढे तो कोणती स्ट्रॅटर्जी वापरणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 3: Akshay Waghmare made this big decision before entering Bigg Boss's house, you will appreciate it by reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.