Bigg Boss Marathi 3 Episodes, 11 Oct: घरात प्रवेश करताच आदिशने टाकला पहिला डाव; घरातील तीन सदस्यांची पहारेकरी म्हणून निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 13:25 IST2021-10-11T13:25:08+5:302021-10-11T13:25:36+5:30
Bigg boss marathi 3: अक्षयने घराबाहेर पाऊल टाकल्यानंतर लगेचच अभिनेता आदिश वैद्यने (adish vaidya) या घरात प्रवेश घेतला आहे.

Bigg Boss Marathi 3 Episodes, 11 Oct: घरात प्रवेश करताच आदिशने टाकला पहिला डाव; घरातील तीन सदस्यांची पहारेकरी म्हणून निवड
काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर बिग बॉस मराठीचं तिसरं (bigg boss marathi 3) पर्व सुरु झालं आहे. घरात दररोज नवनवीन टास्क रंगत असतानाच आता नॉमिनेशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अक्षय वाघमारे (akshay waghmare) या सेलिब्रिटी स्पर्धकाला अवघ्या तीन-चार आठवड्यातच घरातून बाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात घरातून बाहेर पडणारा अक्षय हा पहिला स्पर्धक ठरला आहे. अक्षयने घराबाहेर पाऊल टाकल्यानंतर लगेचच अभिनेता आदिश वैद्यने (adish vaidya) या घरात प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे घरात आल्या आल्या आदिशने त्याचा पहिला डाव टाकला आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर आजच्या भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आदिश त्याचा पहिला डाव टाकताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याने टाकलेल्या डावामुळे घरातील तीन स्पर्धकांना दररोज रात्री घराच्या मुख्य दरवाजाजवळ पहारा द्यावा लागणार आहे.
आदिशने या शोमध्ये एण्ट्री केल्यानंतर बिग बॉसने त्याला एक संधी दिली. यात घरातील कोणत्याही तीन सदस्यांची रात्रीच्या वेळी पहारेकरी म्हणून निवड कर असे आदेश बिग बॉसने दिले. बिग बॉसचा आदेश आल्यानंतर आदिश तीन सदस्यांची निवड करणार आहे. मात्र, हे तीन सदस्य नेमके कोणते हे आजचा भाग पाहिल्यावरच प्रेक्षकांना समजणार आहे.