Bigg Boss Marathi 2 : वीणा जगतापला या गोष्टीची वाटते भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 19:08 IST2019-07-30T18:37:07+5:302019-07-30T19:08:18+5:30
वीणा जगतापला एका गोष्टीची भीती वाटत असून तिला या भयावर मात करायचे आहे अशी तिने कबुली दिली आहे.

Bigg Boss Marathi 2 : वीणा जगतापला या गोष्टीची वाटते भीती
बिग बॉस मराठी २ च्या घरामध्ये आपल्या आवडत्या स्पर्धकांविषयी माहीत नसलेल्या गोष्टी प्रेक्षकांना जाणून घेता येत आहेत. अशाच एका क्षणी घरातील स्पर्धक आपल्या संस्मरणीय प्रसंगांविषयी आणि आपल्याला वाटणाऱ्या भयाबाबत बोलताना दिसले. वूटच्या अनसीन अनदेखाच्या नवीन क्लिपमध्ये वीणा जगतापला एकटे राहण्याचे भय वाटते असे बोलताना ती दिसत आहे. एवढेच नव्हे तर तिला या भयावर मात करायची असल्याची ती कबुली देखील देत आहे.
वीणा तिच्या भयाविषयी शीवला सांगते, ''त्या दिवशी माधव, नेहा आणि मी बसलेलो तेव्हा पण मी त्यांना हेच सांगितलं की मला एकटं राहायची खूप भीती वाटते किंवा एकटं कुठे जायला देखील भीती वाटते.'' ती पुढे सांगते, ''मला एक सोलो ट्रिप करायची आहे पण माझी हिंमतच होत नाही. 'राधा प्रेम रंगी रंगली' ही मालिका संपल्यावर मी खूप विचार केला होता की, मी सोलो ट्रिपला जाईन... पण मला ते जमलेच नाही. भीती वाटते की यार सोलो ट्रिप कशी करायची. पण एकदा तरी मला सोलो ट्रीपला जायचे आहे... मला तो फिअर घालवायचा आहे, पण मला जमत नाहीये.''
यावर शीव उत्सुकतेने विचारतो, ''सोलो ट्रिप कशाला? मज्जा येते तुला एकटीला?'' यावर वीणा सांगते की, तिला एकटेपणाच्या या भीतीवर मात करायची आहे. त्यानंतर वीणाने तिच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला. ती सांगते, ''जेव्हा इथे शिफ्ट झाले तेव्हा तर शॉपिंगला सुद्धा मला एकटीला जायला जमायचं नाही... पैसे आहेत पण कोणाची कंपनी नाही मग कसं जाणार. मग एकदा मी ठरवलं की आज एकटंच जायचं, निघाले आणि वांद्रे येथील माऊंट मेरीला गेले. तिथे थोडा वेळ बसले आणि मग तिकडून हिल रोडला गेले... तिथे शॉपिंग केली आणि मग मरीन ड्राइव्हला जाऊन बसले... सगळं एकटीच, २०१५ची गोष्ट आहे ही. तेव्हा ठरवलेलं की, आता बस कोणी आहे नाही आहे हा विचार काढून टाकायचा, यू आर विथ यूअरसेल्फ....' हे ऐकून शीवने देखील त्याला एकटेपणाची भीती वाटत असल्याचे सांगितले.