Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वेच्या एन्ट्रीने खुलला नेहाचा चेहरा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 02:00 PM2019-07-14T14:00:00+5:302019-07-14T14:00:02+5:30

शिवानी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी प्रयत्न करत होती. अखेरीस तिच्या प्रयत्नांना यश आले आणि शिवानी सुर्वेची पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. पण...

Bigg Boss Marathi 2 : shivani surve entered in bigg boss house but on one condition | Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वेच्या एन्ट्रीने खुलला नेहाचा चेहरा, पण...

Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वेच्या एन्ट्रीने खुलला नेहाचा चेहरा, पण...

googlenewsNext
ठळक मुद्दे घरात घडलेल्या काही घटनांमुळे मला खूपच त्रास होत होता आणि त्यामुळे माझी तब्येत अधिक बिघडत होती,’असे तिने सांगितले होते.

शिवानी सुर्वेला पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस मराठी २’ च्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण प्रेक्षकांची लाडकी शिवानी प्रकृतीच्या कारणांमुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. या आजारपणातून सावरल्यानंतर शिवानी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी प्रयत्न करत होती. अखेरीस तिच्या प्रयत्नांना यश आले आणि शिवानी सुर्वेची पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. पण शिवानी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात दाखल झाली असली तरी बिग बॉसने तिच्यासमोर एक अट ठेवली आहे.


होय, शिवानी तू बिग बॉसच्या घरात सदस्य म्हणून नाही तर पाहुणी म्हणून असशील. परंतु घरातील अन्य सदस्यांना कुठल्याही स्थितीत ही गोष्ट कळता कामा नये, असे बिग बॉसने शिवानीला स्पष्ट बजावले आहे. शिवानी घरात येताच नेहा आणि माधवचे चेहरे आनंदाने खुलले. पण वीणा आणि शिव सारख्या काही सदस्यांच्या कपाळावर काहीशा आठ्या पडल्या. 


बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमामुळे शिवानीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग मिळाले होते. तरी देखील तिने या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला होता.  लोकमतशी बोलताना शिवानीने यामागचे कारण सांगितले होते.

‘माझे काही हेल्थ इश्शू असल्याने घराच्या बाहेर पडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. मी घरात जाण्याच्याआधीच माझ्या हेल्थ प्रोब्लेमविषयी बिग बॉस मराठीच्या टीमला कल्पना दिली होती आणि ते देखील मी घरात असताना जमेल तितकी मला मदत करत होते. पण घरात घडलेल्या काही घटनांमुळे मला खूपच त्रास होत होता आणि त्यामुळे माझी तब्येत अधिक बिघडत होती,’असे तिने सांगितले होते.

Web Title: Bigg Boss Marathi 2 : shivani surve entered in bigg boss house but on one condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.