Bigg Boss Marathi 2: शिवने सांगितले वीणाला त्याच्या एका खास स्वप्नाबाबत, वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 07:19 PM2019-08-12T19:19:43+5:302019-08-12T19:20:45+5:30

शिव ठाकरे वीणा जगतापला त्‍याच्‍या एका खास स्‍वप्‍नाबाबत सांगताना दिसत आहे. 

Bigg Boss Marathi 2: Shiv thakre tells about his dream to veena jagtap | Bigg Boss Marathi 2: शिवने सांगितले वीणाला त्याच्या एका खास स्वप्नाबाबत, वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य

Bigg Boss Marathi 2: शिवने सांगितले वीणाला त्याच्या एका खास स्वप्नाबाबत, वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य

googlenewsNext
ठळक मुद्देमाझ्या रूममध्‍ये ना बिग बॉस विनर असं लिहिलं आहे. मी झोपतो ना ज्या बेडवर, त्याच्या समोरच्या कपाटावर ते मी दोन वर्षांपूर्वीच लिहिलं आहे.

बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांना आवडत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. आपल्याच आवडत्या स्पर्धकाने या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवावे असे प्रत्येकाला वाटत आहे. 

बिग बॉस मराठी २ चा कालचा भाग हा खूप खास होता. सलमान खानने उपस्थित राहून या शोची शोभा वाढवल्‍याने अनेक स्‍पर्धकांचे स्‍वप्‍न सत्‍यात अवतरले. सलमान खान या आठवड्याच्या 'वीकेण्‍डचा डाव'च्या एपिसोडमध्‍ये महेश मांजरेकर यांच्यासोबत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसला. त्यामुळे सगळेच स्पर्धक प्रचंड खूश झाले होते. 

वूटवरील 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये शिव ठाकरे वीणा जगतापला त्‍याच्‍या एका स्‍वप्‍नाबाबत सांगताना दिसत आहे. शिव उत्‍साहित होऊन सांगतो, ''मला ना रात्री स्‍वप्‍नात पूर्ण तेच दिसलं बिग बॉसचा फिनाले, ती एव्‍ही. इथे पाच जणं बसलो होतो आपण सोफ्यावर.'' 

वीणा विचारते, ''कोण ५?'' त्यावर शिव उत्‍तर देतो, ''तीन तर माझ्या डोक्‍यात आहेच. तू, मी, नेहा आणि दोन कोण होते ते माहीत नाही. पण एव्‍ही यार खूप मस्‍त असणार आपला. माझ्या डोक्‍यात काय आहे माहीतेय का? बिग बॉस संपल्यावर ज्या कपड्यात आहे, त्‍या कपड्यात जाऊन स्विमिंगपूलमध्‍ये उडी मारायची, शूज काढायचे, माइक काढायची आणि सरळ उडी.'' 

शिव पुढे म्‍हणतो, ''तुला माहीत आहे या सगळ्या गोष्‍टी ना माझं स्‍वप्‍न होतं. आईला रात्री सतवायचो झोप येत नाही म्‍हणून... कारण माझ्या डोक्‍यात हेच सुरू असायचं की, मला इथे यायचं आहे. माझ्या रूममध्‍ये ना बिग बॉस विनर असं लिहिलं आहे. मी झोपतो ना ज्या बेडवर, त्याच्या समोरच्या कपाटावर ते मी दोन वर्षांपूर्वीच लिहिलं आहे. मी या कार्यक्रमात कधी येणार हे माहीत नव्‍हतं. पण मी या शोमध्‍ये कधी ना कधी तरी येणार हा विश्वास होता. इथे जे काही होतंय ते सगळं मी स्‍वप्‍नात बघितलेलं आहे, जे मी आता जगतोय!'' 

Web Title: Bigg Boss Marathi 2: Shiv thakre tells about his dream to veena jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.