Bigg Boss Marathi 2 Grand Finale Updates : या स्पर्धकांनी मारली अंतिम तीन पर्यंत मजल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 22:06 IST2019-09-01T19:44:18+5:302019-09-01T22:06:21+5:30
बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमात फायनलपर्यंत आता या तीन स्पर्धकांनी मजल मारली आहे.

Bigg Boss Marathi 2 Grand Finale Updates : या स्पर्धकांनी मारली अंतिम तीन पर्यंत मजल
बिग बॉस मराठी 2 ची सध्या चांगलीच हवा आहे. या कार्यक्रमाचा फिनाले आज प्रेक्षकांना पाहायला मिळत असून आता विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आता तीन स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. या तिघांमधील एकाला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 25 लाख रुपये मिळणार आहेत.
शीव ठाकरे, नेहा शितोळे आणि वीणा जगताप यांना सुरुवातीपासूनच बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या विजेतेपदाचे दावेदार मानले जात होते. गेल्या कित्येक दिवसापासून तर शीव आणि नेहाच विजयी ठरतील अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. आता कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यापर्यंत शीव, नेहा आणि वीणा यांनी मजल मारली असून त्यांच्या तिघांमधील एक जण विजेता ठरणार आहे. विजेता कोण होणार याची थोड्याच वेळात घोषणा केली जाणार आहे. वीणा, शीव आणि नेहाच्या फॅन्सना आपलाच आवडता कलाकार विजेता व्हावा असे वाटत आहे. प्रेक्षकांची लाडकी शिवानी सुर्वे बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडली आहे.
वीणाने राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. कलर्स वाहिनीवरील तिच्या या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती तर नेहाने रेडीमिक्स, सुर सपाटा, पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स या प्रसिद्ध वेबसिरिजमध्ये ती काटेकरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
शीव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती. बिग बॉस मराठीमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. शीवला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला असल्याचे त्याने या कार्यक्रमात अनेकवेळा सांगितले आहे. बिग बॉसच्या घरात असताना शीव आणि वीणा यांच्या प्रेमकथेची देखील चांगलीच चर्चा झाली होती. ते या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.