बिग बॉस : बानीचे मन जिंकण्यासाठी गौरवचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 16:37 IST2016-12-15T15:25:57+5:302016-12-15T16:37:33+5:30

इमेज जपण्याच्या नादात बानी जेपासून चार हात लांब राहणाºया गौरव चोपडाच्या मनात बानीविषयी कदाचित परिवर्तन झाले असावे, त्यामुळे तो ...

Bigg Boss: Majesty's apology for winning Bani's mind | बिग बॉस : बानीचे मन जिंकण्यासाठी गौरवचा माफीनामा

बिग बॉस : बानीचे मन जिंकण्यासाठी गौरवचा माफीनामा

ेज जपण्याच्या नादात बानी जेपासून चार हात लांब राहणाºया गौरव चोपडाच्या मनात बानीविषयी कदाचित परिवर्तन झाले असावे, त्यामुळे तो आता तिच्याशी जवळीकता साधण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करीत आहे. आता तर त्याने चक्क पाठीवरच ‘आय अ‍ॅम सॉरी’ असा फलक चिटकवून घरात वावरणे सुरू केले आहे. त्यामुळे येत्या काळात बानी आणि गौरवची प्रेमकथा बहरणार की सुरू होण्याअगोदरच संपुष्टात येणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

.@gauravchopraa finds another way to apologize to @bani_j! Will she forgive him? Find out in tomorrow's episode! #BB10— Bigg Boss (@BiggBoss) December 14, 2016}}}} ">http://

}}}} ">.@gauravchopraa finds another way to apologize to @bani_j! Will she forgive him? Find out in tomorrow's episode! #BB10— Bigg Boss (@BiggBoss) December 14, 2016
सुरुवातीपासूनच बानीने गौरवशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅमेºयांसमोर आपण कसे वागावे याचे भान ठेवणाºया गौरवने तिच्यापासून दूर जाणे पसंत केले. त्यातच साहिल आणि जेसन यांची घरात वाइल्ड कार्ड एंट्री झाल्याने बानीने या दोघांशी मैत्रीचे नाते अधिक घट्ट केले होते. त्यातही जेसनबरोबरचे तिचे संबंध घरातील सर्वांनाच धक्का देणारे ठरले. अर्थात हे संबंध गौरवचाही जळफळाट ठरले. त्यामुळेच त्याने बºयाचदा बानीला नवे मित्र मिळाल्यामुळे आमच्यातील संबंध पहिल्यासारखे राहिले नसल्याचे सर्वांसमोर बोलूनही दाखविले. 



याच टास्कदरम्यान बानी आणि जेसन एकमेकांच्या जवळ आले होते

जेमतेम आठवडाभर राहिलेल्या साहिल आणि जेसनला घराबाहेर पडावे लागल्याने पुन्हा एकदा बानी आणि गौरव यांच्यातील मैत्री फुलायला लागली होती. मात्र गेल्या नॉमिनेशन टास्कमुळे या दोघांमध्ये पुन्हा दुरावा निर्माण झाला. त्याचे असे झाले की, गौरवने नेहमीप्रमाणे माइंड गेम खेळताना बानीला तू कोणाला नॉमिनेट करणार याचा सल्ला दिला. यासाठी दोघांनी प्लॅनही केला. प्लॅननुसार बानी नितीभाला, तर गौरव मोनाला नॉमिनेट करणार होते. ठरल्याप्रमाणे बानीने नीतीभाला नॉमिनेटही केले, परंतु गौरवने मोनाला नॉमिनेट करण्यास नकार दिला. 



मोना आणि गौरवने एकत्र आंघोळ केल्याचा क्षण

त्यावरून बानी आणि गौरवमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. तू ठरल्याप्रमाणे वागत नाही अशा शब्दात तिने त्याला सुनावले. त्यातच नॉमिनेशन टास्कनंतर गौरव आणि मोनाची जवळीकता वाढली. बाथ टबमधील दोघांनी एकत्र केलेली आंघोळ बानीचा संताप वाढविणारी होती. मोना-गौरवची प्रेमकहानी बहरणार तेवढ्यातच सिक्रेट रूममधून मनू पंजाबीची घरात एंट्री झाल्याने गौरवला मोनापासून दूर जावे लागले. 



मोना आणि गौरव एकमेकांची समजुत काढताना

आता तो एकाकी पडला असून, बानीशी जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तिची समजूत काढण्यासाठी तो संधी शोधत आहे. यासाठी त्याने एक उपाय शोधून काढला असून, ‘आय अ‍ॅम सॉरी’ असे लिहिलेला एक फलक पाठीवर चिटकवून तो घरात वावरत आहे. बानीच्या मागे पुढे फिरताना त्याने केलेल्या चुकीची त्याला जाणीव झाल्याचे दाखवून देत आहे. आता बानी त्याला कसा प्रतिसाद देईल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  


Watch @gauravchopraa's unique & sweet way of apologizing to @bani_j in this #BB10#video! https://t.co/95jeiw9abc— Bigg Boss (@BiggBoss) December 15, 2016 ">http://

}}}}

Web Title: Bigg Boss: Majesty's apology for winning Bani's mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.