मिस युनिव्हर्स दीवा स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलेली सुंदरी 'बिग बॉस'मध्ये! 'या' सेलिब्रिटींचीही एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 22:58 IST2025-08-24T22:56:16+5:302025-08-24T22:58:50+5:30
यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया स्टार्सपासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेक मोठे कलाकार 'बिग बॉस'च्या घरात दाखल झाले आहेत.

मिस युनिव्हर्स दीवा स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलेली सुंदरी 'बिग बॉस'मध्ये! 'या' सेलिब्रिटींचीही एन्ट्री!
बहुप्रतीक्षित 'बिग बॉस'च्या १९ व्या पर्वाचा आजपासून श्रीगणेशा झाला. हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. नेहमीप्रमाणेच या पर्वातही अनेक लोकप्रिय आणि वादग्रस्त चेहरे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया स्टार्सपासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेक मोठे कलाकार 'बिग बॉस'च्या घरात दाखल झाले आहेत.
सोशल मीडियावरील लोकप्रिय जोडी 'बिग बॉस'च्या घरात पोहचली आहे. लोकप्रिय लव्हबर्ड्स नगमा मिराजकर आणि आवेज दरबार यांनी एकत्र घरात एन्ट्री घेतली आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची गोष्ट असून, त्यांच्यातील केमिस्ट्री आणि वादविवाद शोला नवीन ट्विस्ट देतील, अशी अपेक्षा आहे.
या जोडीसोबतच अभिनेता अभिषेक बजाज हा 'स्टुडंट ऑफ द इयर २' आणि 'चंदीगड करे आशिकी' यांसारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्ध आहे. त्याच्यासोबतच 'एमटीव्ही रोडीज' फेम बसीर अली यानेही घरात प्रवेश केला आहे. बसीर हा मूळचा हैदराबादचा असून २०१७ मध्ये 'रोडीज' शोमध्ये तो पहिला रनर-अप होता.
या सर्वांमध्ये सर्वात लक्षवेधी एन्ट्री आहे ती म्हणजे नेहल चुडासमा हिची. मिस युनिव्हर्स दीवा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलेली ही सुंदरी आपल्या सौंदर्यासोबतच तिच्या आत्मविश्वास आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. 'बिग बॉस'च्या घरात तिच्या एन्ट्रीमुळे शोमधील ग्लॅमर वाढले असून, ती घरात कसा खेळ करते हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हे सर्व स्पर्धक 'बिग बॉस'च्या घरात येणाऱ्या काळात प्रेक्षकांचं कशाप्रकारे मनोरंजन करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.