Bigg Boss : हिना खानने किश्वर मर्चंटला डिवचले; किश्वरने म्हटले, ‘तुझे कांडही ऐकूण आहे’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 19:02 IST2017-10-05T12:44:26+5:302017-10-05T19:02:46+5:30
किश्वर मर्चंटचा तो किस्सा हिना खानने उकरून काढल्यामुळे तिने लांबलचक एक पोस्ट लिहिली, वाचा नेमके तिने काय लिहिले?

Bigg Boss : हिना खानने किश्वर मर्चंटला डिवचले; किश्वरने म्हटले, ‘तुझे कांडही ऐकूण आहे’!
‘ िग बॉस’च्या नव्या सीजनचे स्पर्धक वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेला वाव निर्माण करून देत आहेत. पहिल्याच दिवशी अंगुरी भाभी ऊर्फ शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यात जुंपली असल्याचे प्रेक्षकांना बघावयास मिळाले होते. आता बिग बॉसच्या घरात असलेल्या हिना खानला बिग बॉसच्याच एका एक्स स्पर्धकाच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. त्याचे झाले असे की, घरात असलेले स्पर्धक एक्स स्पर्धकांविषयी बोलत होते. याचदरम्यान हिना खानने किश्वर मर्चंटचा घरातील एक किस्सा सांगताना तिने केलेले कृत्य खूपच किळसवाणे होते, असे म्हटले. एका अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये हिना खान किश्वरचा तो किस्सा खूपच किळसवाणा असल्याचे म्हणताना दिसत आहे. मात्र आता किश्वरने हिनाला जशास तसे उत्तर दिले असून, तिचे वाभाडे काढण्यास सुरुवात केली आहे.
त्याचे झाले असे की, बिग बॉसच्या सीजन ९ मध्ये किश्वर मर्चंटने वाइल्ड कार्ड एंट्री करणाºया ऋषभ सिन्हाला पाणी देताना त्याच्या ग्लासात थुंकली होती. वास्तविक तिच्या या कृत्याचा नंतर तिला पश्चात्तापही झाला होता. तिने याबाबतची सर्वांसमोर जाहीर माफीही मागितली होती. परंतु तिचा हा किस्सा आता नव्याने चर्चिला जात असल्याने ती भलतीच संतापली आहे. किश्वरने हिनाचा हा व्हिडीओ शेअर करताना त्याखाली लांबलचक तिची प्रतिक्रिया लिहिली. किश्वरने लिहिले की, ‘काही क्षण असे असतात की आपल्या हातून कळत नकळत चुका होत असतात. जेव्हा त्याचा पश्चात्ताप होतो तेव्हा आपण केलेली चूक सुधारताना माफी मागून आयुष्य पुढे नेतो. मी अतिशय सन्मानाने सांगू इच्छिते की, ‘हिना खान तुला घरात फक्त दोन दिवस झाले आहेत. तू इतर विषयांवर चर्चा करू शकते. परंतु जेव्हा टास्क सुरू होतील, तेव्हा किती चांगली आहेस आम्हाला कळेलच. कारण आम्ही तुला बाहेर बसून बघत आहोत. शिवाय तू केलेले कांड मी चांगलेच ऐकूण आहे. ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेदरम्यान तुझे बरेचसे किस्से माझ्या कानावर आले आहेत. तसेच ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवरही तू काय केलेस हे मला माहिती आहे.
![]()
किश्वरने पुढे लिहिले की, ‘याठिकाणी मी माझ्या वतीने स्वत:ची वकिली करीत नाही, कारण तो माझा पास्ट होता. मी ऋषभला याकरिता माफीही मागितली. सध्या आमच्यात खूप चांगले संबंध आहेत. मी एक विजेता म्हणून घराबाहेर पडली असून, तेच माझ्याकरिता महत्त्वाचे आहे. हिना, आॅल द बेस्ट... मी तुला बघत आहे.’ अशा शब्दात किश्वरने राग व्यक्त केला. मात्र काही वेळातच तिने ही पोस्ट डिलीटही केली. सध्या किश्वर ‘ब्रह्मराक्षस’ मालिकेत काम करीत आहे.