भाऊ असावा तर असा! शिव ठाकरेने रक्षाबंधन गिफ्ट म्हणून बहिणीला दिला IPhone, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:35 PM2023-08-30T12:35:25+5:302023-08-30T12:37:45+5:30

Raksha Bandhan 2023 : भाऊ मोठ्या मनाचा! शिव ठाकरेने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला दिलं खास गिफ्ट

bigg boss fame shiv thakare gift i phone 14 pro to his sister as rakshabandhan gift | भाऊ असावा तर असा! शिव ठाकरेने रक्षाबंधन गिफ्ट म्हणून बहिणीला दिला IPhone, म्हणाला...

भाऊ असावा तर असा! शिव ठाकरेने रक्षाबंधन गिफ्ट म्हणून बहिणीला दिला IPhone, म्हणाला...

googlenewsNext

मराठमोळा शिव ठाकरे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मध्यमवर्गातील शिवने अपार मेहतनीच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शिवने हिंदी 'बिग बॉस'मध्येही त्याचा मराठी ठसका दाखवला होता. शिव त्याच्या डॅशिंग अंदाजाबरोबरच त्याच्या स्वभावामुळेही ओळखला जातो. त्याचे लाखो चाहते आहेत. सध्या शिव रक्षाबंधनामुळे चर्चेत आला आहे. 

शिवचं त्याच्या कुटुंबीयांबरोबर अगदी जवळचं नातं आहे. अनेक मुलाखतींतूनही त्याने अनेकदा त्याच्या कुटुंबीयांबरोबर असलेल्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. शिव सोशल मीडियावरही त्याच्या फॅमिलीबरोबरचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो. शिवच्या यशात त्याच्या आईवडिलांबरोबर बहिणीचाही मोठा वाटा आहे. म्हणूनच यंदाच्या रक्षाबंधनाला शिवने त्याच्या बहिणीला खास गिफ्ट दिलं आहे. शिवने त्याच्या बहिणीला आयफोन १४ प्रो गिफ्ट केला आहे. शिवच्या बहिणीचं नाव मनीषा असं आहे. तिला एक मुलगीही आहे. 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती 'या' व्यक्तीच्या प्रेमात, रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा

इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत शिवने रक्षाबंधन गिफ्ट म्हणून आयफोन दिल्यानंतर बहिणीच्या काय भावना होत्या, याबाबतही खुलासा केला. तो म्हणाला, "मी पहिला वडिलांकडून १०० रुपये घेऊन तिला ओवाळणीत एकच रुपया द्यायचो. आणि ते १०० रुपये स्वत:च्या खिशात घालायचो. यावर्षीची रक्षाबंधन खास होती. मी बहिणीला यावर्षी आयफोन १४ प्रो गिफ्ट म्हणून दिला आहे. हे पाहून तिला विश्वासच बसत नव्हता. आता माझे दिवस आले." शिवच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. 

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा भाजपात प्रवेश, म्हणाला, "किती काळ काठावर उभं राहून..."

दरम्यान, रोडिजमधून प्रसिद्धीझोतात आलेल्या शिवने 'बिग बॉस मराठी'मध्ये त्याची छाप पाडली होती. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला होता. त्यानंतर 'बिग बॉस १६'चा तो उपविजेता ठरला. शिवने 'खतरों के खिलाडी'मध्येही सहभाग घेतला होता.

Web Title: bigg boss fame shiv thakare gift i phone 14 pro to his sister as rakshabandhan gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.