Bigg Boss फेम निक्की तांबोळी बोल्ड ड्रेसमधील फोटोमुळे झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले - 'लाज वाटते की नाही? हे पण..'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 02:17 PM2022-03-03T14:17:58+5:302022-03-03T14:18:34+5:30

निक्की तांबोळी (Nikki Tamboli)ने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, जो तिचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो आहे.

Bigg Boss fame Nikki Tamboli was trolled by a photo in a bold dress, Netkari said - 'Shame on you? This too .. ' | Bigg Boss फेम निक्की तांबोळी बोल्ड ड्रेसमधील फोटोमुळे झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले - 'लाज वाटते की नाही? हे पण..'

Bigg Boss फेम निक्की तांबोळी बोल्ड ड्रेसमधील फोटोमुळे झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले - 'लाज वाटते की नाही? हे पण..'

googlenewsNext

बिग बॉस १४ (Bigg Boss 14)ची स्पर्धक निक्की तांबोळी ही साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती बऱ्याचदा आपल्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेते. सलमान खान (Salman Khan)ने होस्ट केलेल्या रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये ती तिच्या लूकवर खूप काम करत होती आणि तिने पुन्हा एकदा तिच्या नवीन अवताराने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच, निक्की तांबोळी(Nikki Tamboli)ने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, जो तिचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो आहे.

नियॉन कलरच्या कोट पँटमध्ये निक्की तांबोळीने हॉटनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि त्यामुळे अनेक जण तिची प्रशंसा करत आहेत, तर अनेकांनी तिला ट्रोलही केले आहे. अभिनेत्री ब्रालेस आउटफिटमध्ये दिसत आहे, जी तिची फिगर दर्शवते. फोटोमध्ये न्यूड मेकअपमध्ये दिसणाऱ्या निकीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला माहित आहे की मी एक अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे, त्यामुळे मला तुमच्या मताची पर्वा नाही...' लोक फोटोवर कमेंट करत आहेत की तुम्ही सुंदर आहात आणि स्वतःच्या स्टाईलने लोकांच्या मनावर राज्य करतेस मग नग्नता दाखवायची काय गरज होती?

त्याचवेळी एका युजरने लिहिले की, 'मला कळत नाही की आजकाल न्यूडिटी हा ट्रेंड का झाला आहे, लोक कपडे नीट का घालत नाहीत?' त्याचवेळी प्रत्येकजण लिहित आहे की, तुला काय झाले आहे तांबोळी. ? हे सगळं करून काय मिळतं? काही नेटकरी म्हणाले की, तिने काय परिधान केले आहे ते वेगळे का करत नाही….तर अनेकांना तिचा हा बोल्ड लूक आवडला आहे.

निक्की तांबोळीला नाही ट्रोलर्सची पर्वा
निक्की तांबोळीच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट होते की तिला ट्रोलर्सची अजिबात भीती वाटत नाही. तिच्याबाबतीत कोण काय म्हणतो याने काही फरक पडत नाही. ती नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे खूप चर्चेत असायची, पण यावेळी तिने लक्ष वेधण्यासाठी बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.

Web Title: Bigg Boss fame Nikki Tamboli was trolled by a photo in a bold dress, Netkari said - 'Shame on you? This too .. '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.