'अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!', बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी अभिनेत्री झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 07:26 PM2021-05-25T19:26:04+5:302021-05-25T19:26:46+5:30

अभिनेत्रीचे फोटो पाहून ट्रोलर्सनी तिला असंख्य प्रश्न विचारले आहेत. एका युजरने लिहिले की, अरे, तू इतकी मोठी अभिनेत्री झालीस की पॅन्ट घालायला विसरलीस ?

Bigg Boss Fame Jasmin Bhasin forget wearing pant as she moves out with her new Puppy | 'अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!', बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी अभिनेत्री झाली ट्रोल

'अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!', बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी अभिनेत्री झाली ट्रोल

googlenewsNext

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आणि बिग बॉस १४ मधील स्पर्धक जास्मिन भसीनला शोमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावरही ती सातत्याने चर्चेत येत असते. ती नेहमी आपला बॉयफ्रेंड अली गोनीसोबत पहायला मिळते आहे. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप भावते. मात्र यावेळी जास्मिन भसीन एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे.

बिग बॉस फेम जास्मिन भसीन तिचा पाळीव कुत्र्यासोबत गेल्या आठवड्यात जुहू येथे स्पॉट दिसली. जुहू येथे जास्मिन कुत्र्यासोबत संध्याकाळी फिरताना दिसली. यावेळी तिने लाल रंगाच्या स्वेट शर्ट घातला होता. यासोबतच तिने काळ्या रंगाची छोटी शॉर्टस देखील घातली होती. तिची शॉर्ट्स इतकी छोटी होती की फोटोत ती दिसत देखील नाही असे वाटत होते की जास्मिनने फक्त स्वेट शर्टचे घातले होते. यावेळचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 


जास्मिन भसीनचा पहायला मिळत असलेल्या व्हिडीओत ती गरीब मुलांशी प्रेमाने बोलताना दिसते आहे. तिने त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. त्यामुळे काही लोक जास्मिनचे कौतुक करताना दिसत आहे. तर तिचे हे फोटो पाहून ट्रोलर्स कमेंट करत आहेत की ती पॅन्ट घालयला का विसरली?, तर एका युजरने लिहिले की, अरे, तू इतकी मोठी अभिनेत्री झालीस की पॅन्ट घालायला विसरलीस ?


जास्मिन अली या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर जास्मिन भसीन दोन म्युझिक व्हिडीओत दिसली. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड अली गोनीदेखील दिसला. तिचे 'सूट बडा टाइट' आणि 'तू भी सताया जाएगा...' ही दोन्ही गाणी सुपरहिट ठरली.

Web Title: Bigg Boss Fame Jasmin Bhasin forget wearing pant as she moves out with her new Puppy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.