"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी

By कोमल खांबे | Updated: July 17, 2025 17:05 IST2025-07-17T17:05:12+5:302025-07-17T17:05:35+5:30

परदेशात ही डॉल खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लागल्या होत्या. मात्र, त्यानंतर काहीच दिवसांत अनेकांनी ही डॉल शापित असल्याचं म्हणत तिला जाळून टाकलं होतं. बिग बॉस फेम अभिनेत्रीनेही लाबुबू डॉलचा भयानक किस्सा सांगितला आहे. 

bigg boss fame archana gautam shared cursed labubu doll horifying story said her marriage broken | "दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी

"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी

सध्या सोशल मीडियावर लाबुबू डॉल ट्रेंडमध्ये आहे. हाँगकाँगमध्ये बनलेल्या या लाबुबू डॉलची सध्या जगभरात चर्चा आहे. भारतातही या डॉलची प्रचंड क्रेझ आहे. अनेक सेलिब्रिटींनीही ही लाबुबू डॉल खरेदी केली आहे. तर काही जण ट्रेंड फॉलो करण्यासाठी ही डॉल विकत घेत आहेत. सुरुवातीला परदेशात ही डॉल खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लागल्या होत्या. मात्र, त्यानंतर काहीच दिवसांत अनेकांनी ही डॉल शापित असल्याचं म्हणत तिला जाळून टाकलं होतं. बिग बॉस फेम अभिनेत्रीनेही लाबुबू डॉलचा भयानक किस्सा सांगितला आहे. 

बिग बॉस फेम अर्चना गौतमने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडीओ शेअर करत लाबुबू डॉल विकत न घेण्याच सल्ला चाहत्यांना दिला आहे. या व्हिडीओत ती म्हणते, "तुजल माझ्या घरी आलीये आणि तिने मला विचारलं की दीदी तू लाबुबु डॉल आणलीस का? मी म्हटलं की नाही. तर तिने मला सांगितलं की अजिबात लाबुबु घरी आणू नकोस. माझ्या मैत्रिणीने घरी लाबुबु डॉल आणली आणि तिचं ठरलेलं लग्न मोडलं. ज्या दिवशी तिने लाबुबु डॉल घरी आणली त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांचं निधन झालं". 

त्यानंतर अर्चनाची मैत्रीण तुजल म्हणते, "तुम्ही प्लीज घरी लाबुबु आणू नका. ही चांगली गोष्ट नाही. तिचं लग्न डिसेंबरमध्ये होणार होतं. मात्र लाबुबु डॉल घरी आणताच तिचं लग्न मोडलं. लाबुबु घरी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे वडील वारले. त्यांना काहीच आजारही नव्हता". 

अर्चनाही ट्रेंड फॉलो करत लाबुबु डॉल घेणार होती. मात्र तिने खरेदी केली नाही. "थँक गॉड...खरं तर मी बिझी होती त्यामुळे लोखंडवाला मार्केटला गेले नाही. पण, जर मी फ्री असते तर मी नक्कीच ती डॉल आणली असती. कारण ती डॉल सगळीकडे ट्रेंड होती. पण, त्या डॉलचा चेहराच इतका घाणेरडा आहे की लोक कसे घेतात माहीत नाही आणि तिला ट्रेंड बनवलं आहे. या सगळ्या गोष्टीत न पडलेलंच बरं आहे", असं ती म्हणाली. 

Web Title: bigg boss fame archana gautam shared cursed labubu doll horifying story said her marriage broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.