प्रणित मोरे की गौरव खन्ना, कोण ठरला 'बिग बॉस १९'चा पहिला फायनलिस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 09:37 IST2025-11-26T09:35:48+5:302025-11-26T09:37:15+5:30
'बिग बॉस १९'ला पहिला फायनलिस्ट मिळाला आहे.

प्रणित मोरे की गौरव खन्ना, कोण ठरला 'बिग बॉस १९'चा पहिला फायनलिस्ट!
लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या काही दिवसांमध्ये शोचा विजेता घोषित होणार आहे. त्यापूर्वीच 'तिकीट टू फिनाले' (Ticket to Finale) टास्कने शोचा उत्साह शिगेला पोहोचला. बिग बॉसच्या घरात सध्या उरलेल्या स्पर्धकांपैकी चार जणांनी 'तिकीट टू फिनाले' साठी आपली दावेदारी निश्चित केली होती. यामध्ये अशनूर कौर, प्रणीत मोरे, गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट यांचा समावेश होता. फायनलिस्ट ठरलेल्या या चार स्पर्धकांमध्ये अंतिम फेरीचे तिकीट जिंकण्यासाठी एक खास टास्क आयोजित करण्यात आला. या टास्कनंतर शोला त्याचा पहिला फायनलिस्ट मिळाला आहे.
अंतिम फेरीच्या तिकीटासाठी घेण्यात आलेल्या टास्कचे नाव होते 'वेल ऑफ डेस्टिनी'. ही एक जादुई विहीर आहे, जी फक्त तिला आनंद देणाऱ्यांनाच बक्षीस देते. या टास्कमध्ये स्पर्धकांना त्यांच्या खांद्यावर एक काठी घेऊन जावे लागत असे ज्यामध्ये दोन वाट्या होत्या, एकात लाल पाणी होते आणि दुसऱ्यात हिरवे पाणी होते. या टास्कमध्ये स्पर्धकांना शरीराचे संतुलन राखावे लागणार होते. जर लाल पाणी सांडले आणि हिरव्या रेषेपर्यंत पोहोचले, तर तो स्पर्धक टास्कमधून बाहेर होणार होता. तीन फेऱ्यांमध्ये प्रत्येक फेरीत एक स्पर्धक बाहेर पडणार होता. शेवटपर्यंत ज्या स्पर्धकाने आपले लाल पाणी वाचवले, त्याला अंतिम फेरीचे तिकीट मिळणार होते.
गौरव खन्ना ठरला पहिला फायनलिस्ट
बिग बॉस अपडेट पेजनुसार, अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या टास्कमध्ये गौरव खन्ना याने बाजी मारली आहे. गौरव खन्ना हा 'बिग बॉस १९' च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. पहिल्या फेरीत मालतीने फरहानाला बाहेर काढले. दुसऱ्या फेरीत फरहानाने प्रणितला बाहेर केले. तिसऱ्या फेरीत तान्याने अशनूरला बाहेर काढले. अखेरीस, गौरव खन्नाने हा टास्क जिंकून थेट अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आणि शोचा पहिला फायनलिस्ट बनण्याचा मान मिळवला.

ट्रॉफी कोण उचलणार?
गौरव खन्नाच्या अंतिम फेरीत प्रवेशामुळे आता उर्वरित आठ स्पर्धकांमध्ये पुढील दोन आठवड्यात ट्रॉफीसाठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे. सध्या घरात आठ स्पर्धक शिल्लक आहेत. या आठवड्यात कोणताही कॅप्टन घोषित करण्यात आलेला नाही. 'बिग बॉस १९' ची ट्रॉफी कोण जिंकतो, हे पाहणे आता खूपच रंजक ठरणार आहे.