"जरा विचार करून बोलत जा", रोहित शेट्टीने अमालची खरडपट्टी काढली, 'बिग बॉस'ला म्हणाला होता Biased
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:32 IST2025-11-15T12:32:04+5:302025-11-15T12:32:37+5:30
यंदाच्या आठवड्यात वीकेंड का वारमध्ये सलमान खान दिसणार नाहीये. तर रोहित शेट्टी वीकेंड का वार होस्ट करणार आहे. वीकेंड का वारमध्ये रोहितने अमालचीही खरडपट्टी काढली. शोला पक्षपाती म्हणण्यावरुन रोहितने अमालला आरसा दाखवला.

"जरा विचार करून बोलत जा", रोहित शेट्टीने अमालची खरडपट्टी काढली, 'बिग बॉस'ला म्हणाला होता Biased
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' हे पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. घरात शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी आणि टॉप ५मध्ये स्थान मिळवण्यासाठी घरातीस सदस्य प्रयत्न करत आहेत. घरात या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क पार पडला. ज्यामध्ये मोठा ट्विस्ट होता. कॅप्टन बनण्यासाठी गौरव खन्नाने इतर सदस्यांना नॉमिनेट केलं. त्यामुळे संपूर्ण घर त्याच्याविरोधात गेलं. यामध्ये बिग बॉसला अमाल मलिकने पक्षपाती असल्याचंही म्हटलं. यावरुन वीकेंड का वारमध्ये अमालला सुनावलं गेलं आहे.
यंदाच्या आठवड्यात वीकेंड का वारमध्ये सलमान खान दिसणार नाहीये. तर रोहित शेट्टी वीकेंड का वार होस्ट करणार आहे. रोहित शेट्टी घरातील सदस्यांना खडे बोल सुनावणार आहे. वीकेंड का वारमध्ये रोहितने अमालचीही खरडपट्टी काढली. शोला पक्षपाती म्हणण्यावरुन रोहितने अमालला आरसा दाखवला. एवढंच नव्हे तर तू चुकीचं खेळतोस असं म्हणत रोहित शेट्टीने अमाल मलिकची कानउघाडणी केली. बोलण्याआधी विचार कर, असंही रोहित शेट्टी अमालला म्हणाला. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.
प्रोमोमध्ये दिसतंय की रोहित अमालला म्हणतो, "अमाल शहबाजदेखील हेच म्हणाला की मीदेखील कॅप्टन्सीच निवडली असती. मग गौरव कसा काय चुकीचा? अमाल विचार करून बोलत जा. जेव्हा तुझ्याप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तेव्हा तुला वाटलं की हे चुकीचं आहे". त्यावर अमाल उत्तर देतो की, "सर मनातून असं मला वाटलं. ते चुकीचं पण असू शकतं". त्यावर रोहित शेट्टी म्हणाला, "तुझ्या मनाच्या फिलिंग आणि एका शोला पक्षपाती(biased) बोलण्यात खूप फरक असतो. हा शो खरंच biased आहे का? तू असं म्हणालास की मी घर सोडून निघून जाईन. तू खरंच जाशील का? तू चुकीचं खेळतोस. तू चुकीचा आहेस तर चुकीचा आहेस. " दरम्यान, घरातील सदस्यांनी केलेल्या व्होटिंगनंतर गौरवची कॅप्टन्सी काढून घेत बिग बॉसने शहबाजला कॅप्टन केलं. आणि त्यानंतर शहबाज सोडून घरातील सगळे सदस्य नॉमिनेट झाले.