हीच खरी मराठी माणसाची संस्कृती! अश्नूरच्या वडिलांसोबत प्रणित मोरेची 'ती' कृती; व्हिडीओ पाहून कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:43 IST2025-11-18T17:42:25+5:302025-11-18T17:43:18+5:30
अश्नूरने वडील गुरमित सिंग यांनी 'बिग बॉस १९'च्या घरात येताच सगळ्या सदस्यांची भेट घेतली. घराती इतर सदस्य त्यांना भेटले. काहींनी त्यांची गळाभेट घेतली. मात्र प्रणित मोरेने त्यांना जो आदर दिला, त्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

हीच खरी मराठी माणसाची संस्कृती! अश्नूरच्या वडिलांसोबत प्रणित मोरेची 'ती' कृती; व्हिडीओ पाहून कराल कौतुक
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'चं पर्व अंतिम टप्प्यात आलं असून आता घरात फक्त ९ सदस्य बाकी राहिले आहेत. हा आठवडा 'बिग बॉस १९'च्या सदस्यांसाठी स्पेशल असणार आहे. 'बिग बॉस १९'चा हा आठवडा फॅमिली वीक म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे. या आठवड्यात घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील काही लोक भेटायला येणार आहेत. कुनिका सदानंदचा मुलगा आणि अश्नूर कौरच्या वडिलांनी कालच्या भागात घरात एन्ट्री घेतली.
अश्नूरने वडील गुरमित सिंग यांनी 'बिग बॉस १९'च्या घरात येताच सगळ्या सदस्यांची भेट घेतली. घराती इतर सदस्य त्यांना भेटले. काहींनी त्यांची गळाभेट घेतली. मात्र प्रणित मोरेने त्यांना जो आदर दिला, त्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. 'बिग बॉस १९'च्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की अश्नूरच्या वडिलांची अमाल मलिक आणि गौरव खन्ना गळाभेट घेतात. पण, प्रणित येताच तो आधी त्यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतो. आणि मग तो गुरमीत यांची गळाभेट घेतो.
'मोठं होणं सोपं आहे, संस्कार टिकवणं कठीण' असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. "उंची बदलते पण अंतर्मनाला आकार संस्कारच देतात", "मराठी संस्कार", "हीच खरी मराठी माणसाची संस्कृती", "शेवटी मराठी माणूस", "प्रणित भाऊ तूच खरा विनर आहेस", अशा कमेंट चाहत्यांनी करत प्रणितचं कौतुक केलं आहे.