"आधी कपडे घालून ये, मग माझ्याशी बोल...", मालती चहरची जीभ घसरली, नेहालवर केली वाईट कमेंट
By कोमल खांबे | Updated: October 15, 2025 11:36 IST2025-10-15T11:35:51+5:302025-10-15T11:36:52+5:30
'बिग बॉस'च्या घरातील नवीन प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मालती आणि नेहालमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे. पण, या वादात मालतीने नेहालच्या कपड्यांवर कमेंट केली आहे.

"आधी कपडे घालून ये, मग माझ्याशी बोल...", मालती चहरची जीभ घसरली, नेहालवर केली वाईट कमेंट
Bigg Boss 19: मालती चहरने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यापासून छोट्या छोट्या कारणावरुन वाद होताना दिसत आहेत. यंदाच्या आठवड्यात नेहाल घराची कॅप्टन झाली आहे. सुरुवातीला तान्या मित्तलला टार्गेट केल्यानंतर आता मालतीने तिचा मोर्चा नेहालकडे वळवल्याचं दिसत आहे. 'बिग बॉस'च्या घरातील नवीन प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मालती आणि नेहालमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे. पण, या वादात मालतीने नेहालच्या कपड्यांवर कमेंट केली आहे.
या व्हिडीओत नेहाल म्हणाते, "रव्याचा शिरा बनतोय...यावर कोणीही काहीही बोलणार नाही". त्यावर मालती चहरने "खराब बनेल..." अशी प्रतिक्रिया देत वाद सुरू केला. नेहाल आणि मालतीच्या या वादात बसीरने उडी घेतली. तो तिला म्हणाला, "तू काय बोलतेस हे तुला कळत नाही का?". त्यावर मालती त्याला "तू आमच्यात का बोलत आहेस? बकवास करायला मध्ये येतो", असं म्हणाली. मालतीला नेहालने उत्तर दिलं. नेहाल म्हणाली, "तो बोलणार मग काय झालं...कुठूनही येतात आणि लोकांना विचारतात तुम्ही आयुष्यात काय केलंय? तू आयुष्यात काय केलंस?".
नेहालच्या बोलण्याने मालती भडकते आणि रागाच्या भरात ती तिच्या कपड्यांवर कमेंट करते. "आधी कपडे घालून ये आणि मग माझ्याशी बोल", असं मालती नेहालला म्हणते. मालतीचं हे वक्तव्य ऐकून घरातील सगळेच आश्चर्यचकित होतात. "तू काय म्हणालीस??", असं कुनिका सदानंद म्हणते. मालतीने नेहालच्या कपड्यांवर कमेंट केल्याने तिला ट्रोलही केलं जात आहे.