बिग बॉस 18 मध्ये हा तृतीयपंथी सोशल मीडिया स्टार होणार सहभागी? सविस्तर वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 06:52 PM2024-03-02T18:52:17+5:302024-03-02T18:53:53+5:30

बिग बॉस 18 चं बिगुल वाजलं असून हा सदस्य घरातला पहिला सदस्य म्हणून निश्चित झालाय

Bigg Boss 18 first contestant influencer pooja sharma rekha will be seen | बिग बॉस 18 मध्ये हा तृतीयपंथी सोशल मीडिया स्टार होणार सहभागी? सविस्तर वाचा

बिग बॉस 18 मध्ये हा तृतीयपंथी सोशल मीडिया स्टार होणार सहभागी? सविस्तर वाचा

 बिग बॉस 17 काहीच दिवसांपुर्वी संपलं. मुनावर फारुकीने  बिग बॉस 17 च्या ट्रॉफीवर त्याचं नाव कोरलं. आता  बिग बॉस 18 चं बिगुल वाजलं असून लवकरच  बिग बॉस 18 कलर्स टीव्हीवर सुरु होईल. तत्पुर्वी  बिग बॉस 18 मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याची उत्सुकता शिगेला आहे. अशातच  बिग बॉस 18 मध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचं नाव समोर आलंय. 

आत्तापर्यंत बिग बॉस सीझन 18 मध्ये एंट्री घेणाऱ्यांमध्ये अनेक नावांची चर्चा झाली आहे. अशा परिस्थितीत आता शोमध्ये जाणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचे नाव समोर येत आहे, जो एक सोशल मीडिया स्टार आहे. रिपोर्ट्सनुसार, डिजिटल कंटेंट क्रिएटर पूजा शर्मा रेखान बिग बॉस 18 मध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. पूजा हि एक ट्रान्सजेंडर असून तिचं खूप फॅन फॉलोईंग आहे.

पूजा रेखा शर्मा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये डान्स करण्यासाठी खूप प्रसिद्ध झाली होती. पूजा तिचा लूक अगदी अभिनेत्री रेखासारखा ठेवते. म्हणूनच लोक तिला 'रेखा' या नावाने ओळखतात. पूजा शर्मा ही ट्रान्सजेंडर असून तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. पूजा लोकल ट्रेनने प्रवास करताना किंवा इतर ठिकाणी गेल्यावर ती शगुन म्हणून इतरांकडून फक्त एक रुपया घेते. सलमान खान पुन्हा एकदा बिग बॉस 18 च्या होस्टींगची जबाबदारी सांभाळणार आहे.

Web Title: Bigg Boss 18 first contestant influencer pooja sharma rekha will be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.